बापरे! टँकर फुटताच पाण्यासारखी वाहून गेली ५० हजार लिटर रेड वाईन; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 02:56 PM2020-09-27T14:56:32+5:302020-09-27T15:15:47+5:30

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वायनरी टँक फुटल्यामुळे वेगाने वाईन बाहेर येत आहे. संपूर्ण रस्ता या वाईनमुळे लालबुंद झाला आहे. हे पाहून अनेक सोशल मीडियार युजर्स भावूक झाले आहेत. 

50000 litres of red wine explodes from winery tank people cant stop crying | बापरे! टँकर फुटताच पाण्यासारखी वाहून गेली ५० हजार लिटर रेड वाईन; पाहा व्हिडीओ

बापरे! टँकर फुटताच पाण्यासारखी वाहून गेली ५० हजार लिटर रेड वाईन; पाहा व्हिडीओ

Next

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल  होत आहे.  हा व्हिडीओ पाहून मद्यपींना खूप दुःख होऊ शकतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रेड वाईनचा टँकर फुटल्यामुळे तब्बल ५० हजार लीटर रेड वाईन पाण्याप्रमाणे वाहून गेली आहे. रेड वाईन ही खूप महाग असते. अनेकजण कधीतरीच रेड वाईन घेतात. हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ स्पेनचा असल्याचं समोर आलं आहे. 

सोशल मीडियावर Radio Albacete नावच्या ट्विटर युजसने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील असून रेड वाईन पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता वायनरी टँक फुटल्यामुळे वेगाने वाईन बाहेर येत आहे. संपूर्ण रस्ता या वाईनमुळे लालबुंद झाला आहे. हे पाहून अनेक सोशल मीडियार युजर्स भावूक झाले आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ४९  सेकंदाच्या या व्हिडीओत पूर आल्याप्रमाणे रेड वाईन वाहताना तुम्हाला दिसून येईल. या व्हिडीओवर भन्नाट मीम्स तयार झाले आहेत. आतापर्यंत ४९ हजारांपेक्षा जास्त जणांना हा व्हिडीओला लाईक केलं आहे.  १७ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ  रिट्विट केला आहे. ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

हे पण वाचा-

Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

Web Title: 50000 litres of red wine explodes from winery tank people cant stop crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.