Viral video of turtle playing with pup and running after ball has twitter amazed | Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस

Video : कुत्र्याच्या पिल्लाला कासवासह खेळण्याची भारीच हौस; नेटिझन्सनी पाडला लाईक्सचा पाऊस

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होत असतात. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.  कारण नेहमीच माणसांचा वावर असलेले रस्ते लॉकडाऊनच्या काळात अनेक महिन्यांपर्यंत सामसुम होते. यावेळी वेगवेगळ्या प्राण्यांनी आपल्या नेहमीच्या ठिकाणातून बाहेर येत मुक्त संचार करायला सुरूवात केली. तर अनेक प्राण्यांनी मोकळ्या रस्त्यांवर फिरण्याचा आनंद  घेतला.

सध्या  सोशल मीडियावर एका कुत्र्याच्या पिल्लाचा आणि कासवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ४३ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये कासव आणि कुत्र्याचे पिल्लू बॉलने खेळत आहे. या व्हिडीओतून या दोघांची घट्ट मैत्री दिसून येत आहे. कुत्र्याचे क्यूट पिल्लू आपल्या पायांनी बॉलला लांब  फेकत आहे. तर कासव या बॉलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.  कुत्र्याचे पिल्लू वारंवार बॉल लांब फेकत आहेत. तर कासव या बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

हा व्हिडीओ jamie @gnuman1979 या  ट्विटर युजरनं शेअर केला आहे. २४ सप्टेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला  होता. यातील गमतीचा भाग म्हणजे कासव लगेचच बॉलच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियावर युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला ९ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.  कासवही वेगाने धावू शकतो अशी कमेंट एका युजरने केली आहे. 

हे पण वाचा-

अरे व्वा! केळ्याचा कचरा ठरला उत्पन्नाचं साधन; हजारो महिलांना 'असा' मिळाला रोजगार

Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral video of turtle playing with pup and running after ball has twitter amazed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.