हे प्रभु हे हरिराम...! Maruti 800 वर वाहून नेले चक्क 24 ड्रम, बघून लोकांची बोलती बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:05 IST2024-11-11T11:57:54+5:302024-11-11T12:05:04+5:30
Viral Video : व्हिडिओत मारूती-८०० कारच्या छतावर एक-दोन किंवा तीन नाही तर तब्बल २४ प्लास्टिकचे ड्रम बांधून नेले जात आहेत.

हे प्रभु हे हरिराम...! Maruti 800 वर वाहून नेले चक्क 24 ड्रम, बघून लोकांची बोलती बंद!
Maruti suzuki-800 running on road loading heavy drums: जगभरात असे बरेच लोक असतात जे काहीना काही आश्चर्यकारक जुगाड करत असतात. रोजच्या कामादरम्यान हे लोक अशा काही गोष्टी करतात ज्या बघून थक्क व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत मारूती-८०० कारच्या छतावर एक-दोन किंवा तीन नाही तर तब्बल २४ प्लास्टिकचे ड्रम बांधून नेले जात आहेत. हा नजारा पाहून लोकांचा यावर विश्वासच बसत नाहीये.
इन्स्टावर या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
मारूती ८०० एक छोटी फॅमिली कार आहे. पण त्यावर इतकं काही वाहून न्यावं हे जरा अचंबित करणारंच आहे. गाडी तब्बल २४ ड्रम एकत्र बांधले आहेत. त्यानंतर कार वेगाने रस्त्याने धावतही आहे. अर्थातच ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं असेल ते अवाक् झाले असतील. अशात हा व्हिडीओ व्हायरल होणंही सहाजिक आहे.
या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्सही मजेशीर आहेत. एका यूजरने लिहिलं की, हे बघितल्यावर या कारचं नाव मारूती ८०० वरून मारूती ८००० करायला हवं. दुसऱ्याने लिहिलं की, जर ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं तर कारच्या किंमतीपेक्षा जास्त दंड भरावा लागेल. तर काही लोकांनी हे चित्र बघून चिंताही व्यक्त केली आहे. त्यांचं मत आहे की, हे घातक आहे आणि ट्रॅफिक पोलिसांनी लगेच यावर कारवाई केली पाहिजे. जेमेकरून एखादी दुर्घटना घडू नये.