Video - १७ वर्षांच्या मुलाने फेडलं आईचं १२ लाखांचं कर्ज; बेस्ट सरप्राईज पाहून पाणावतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:14 IST2026-01-05T13:13:31+5:302026-01-05T13:14:48+5:30
सोशल मीडियावर सध्या एका माय-लेकाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे.

Video - १७ वर्षांच्या मुलाने फेडलं आईचं १२ लाखांचं कर्ज; बेस्ट सरप्राईज पाहून पाणावतील डोळे
सोशल मीडियावर सध्या एका माय-लेकाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. या व्हिडिओमध्ये एका १७ वर्षांच्या मुलाने आपल्या आईला असं सरप्राइज दिलं आहे, ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. या मुलाने आपल्या आईचे १०,००० पाउंड म्हणजेच जवळपास १२ लाख रुपयांचं कर्ज फेडलं आहे. 'अमन दुग्गल' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये अमन आपल्या आईशी अत्यंत भावूक होऊन बोलताना दिसत आहे. तो थोडासा घाबरलेला वाटत असला, तरी त्याच्या आवाजात आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे जाणवतो. तो आपल्या आईला सांगतो की, ती त्याच्या आयुष्यातील सर्वात खास स्त्री आहे आणि तिने त्याच्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागाबद्दल तो कृतज्ञ आहे. अमन जसा बोलू लागतो, तसे त्याच्या आईचे डोळे भरून येतात. ती रडत म्हणते की, "मला समजत नाहीय की मी इतकी भावूक का होत आहे." या क्षणी माय-लेकातील नात्याची वीण अधिक घट्ट झालेली पाहायला मिळते.
असं दिलं मोठं सरप्राईज
अमन आपल्या आईला डोळे उघडायला सांगतो आणि तिच्या हातात पैसे ठेवतो. तो सांगतो की, हे पैसे तिचं सर्व कर्ज फेडण्यासाठी आहेत. इतकंच नाही तर तो पुढे असंही वचन देतो की, आतापासून दर महिन्याला घराची सर्व बिलं आणि खर्च तो स्वतः उचलणार आहे. हे ऐकताच आईला अश्रू अनावर झाले आणि ती आपल्या मुलाला मिठी मारून ढसाढसा रडू लागली.
"टिप नको सर, फक्त रेटिंग द्या"; कष्टकरी बापाचा 'स्वाभिमान'; लेकाला सोबत घेऊन करतो डिलिव्हरी
एक वर्षात पूर्ण केलं स्वप्न
व्हिडिओसोबत अमनने एक मोठी कॅप्शनही लिहिली आहे. त्याने म्हटले आहे की, त्याच्या आईने त्याच्यासाठी जे काही केलं आहे, त्यासमोर हे काहीच नाही. तो गेल्या अनेक दिवसांपासून या क्षणाची कल्पना करत होता आणि केवळ एका वर्षाच्या आत त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. याबद्दल त्याने देव, त्याची आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. लोक या १७ वर्षांच्या मुलाची विचारसरणी, प्रगल्भता आणि जबाबदारीचे मनापासून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं की, "मी सात वर्षांचा असतानाच माझी आई गमावली आहे, मला अशी संधी मिळाली असती तर मी काहीही केलं असतं." आजच्या काळात जेव्हा कमी वयातील मुलांना बेजबाबदार मानलं जातं, तेव्हा ही गोष्ट एक वेगळा आदर्श घालून देते.