सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचे निकाल आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले असून, यात राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५० पैकी तब्बल ४१ जागांवर महायुतीने कब्जा केला आहे. तसेच बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्षांनीही अनेक ठिकाणी विजय संपादन केला आहे. मात्र एकेकाळी जिल्ह्यात मोठी ताकद असलेल्या उद्धव सेनेचा धुव्वा उडाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी ५० जागांचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये भाजपाने २७, शिंदेसेनेने १४ तर उद्धवसेनेने ३ जागांवर विजय मिळवला आहे. त्याबरोबरच बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ६ अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली आहे. विजय झालेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ५ अपक्षांचा समावेश आहे.
याबरोबरच जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांवर महायुतीने आपल्या विजयाचा झेंडा फडकवला आहे. वैभववाडी तालुक्यात भाजपाने पंचायत समितीच्या सहा पैकी सहा जागा जिंकल्या आहेत. तर देवगडमध्येही भाजपाने एकतर्फी यश मिळवलं आहे. कणकवलीमध्ये पंचायत समितीच्या १६ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. कुडाळमध्ये महायुतीने पंचायत समितीच्या ९ पैकी सात जागा जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १८ पैकी १३ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. तर ५ जागांवर उद्धवसेनेचा विजय झाला आहे. सावंतवाडीमध्येही पंचायत समितीच्या १८ जागांपैकी महायुतीने १२ जागा जिंकल्या आहेत. तर ५ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत.
नितेश राणे यांचा मतदारसंघ असलेल्या कणकवली मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये महायुतीने निर्विवाद यश मिळवलं आहे. तर नितेश राणेंचा मतदारसंघ असलेल्या कुडाळ-मालवणमध्येही महायुतीचा वरचष्मा राहिला आहे. मात्र शिंदेसेनेचे आमदार असलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीला काही प्रमाणात पीछेहाट सहन करावी लागली आहे. येथील अनेक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे.
Web Summary : In Sindhudurg, the BJP-Shinde Sena alliance secured a major victory in Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Winning 41 of 50 Zilla Parishad seats, the alliance overshadowed Uddhav Sena. Independents also gained ground, while the BJP swept Vaibhavwadi.
Web Summary : सिंधुदुर्ग में, भाजपा-शिंदे सेना गठबंधन ने जिला परिषद और पंचायत समिति चुनावों में बड़ी जीत हासिल की। 50 में से 41 जिला परिषद सीटें जीतकर, गठबंधन ने उद्धव सेना को पछाड़ दिया। निर्दलियों ने भी जमीन हासिल की, जबकि भाजपा ने वैभववाड़ी में क्लीन स्वीप किया।