शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी नंबरप्लेटची ‘झेड सीरीज’ संपली

By admin | Updated: December 23, 2014 23:43 IST

‘डबल ए’ने सुरु : ५६0 वाहनांची नवीन नोंदणी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारसायकलच्या नंबरप्लेटवर घालण्यात येणारी झेडपर्यंतची सिरीज संपल्याने आता जिल्ह्यातील नवीन मोटारसायकलवर ‘डबल ए’ अशी सिरीज सुरु झाली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून सिंधुदुर्गात या नवीन सिरीजनुसार ५६० मोटारसायकलची नोंदणी करण्यात आली आहे.एखादे वाहन खरेदी केल्यावर त्याची अधिकृतपणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी केली जाते. नंतर त्या वाहनाला आरटीओकडून पासिंग व वाहनक्रमांक दिला जातो. त्यासाठी वाहनक्रमांकाच्या अगोदर ए ते झेड पर्यंतची सिरीज वापरली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोटारसायकलच्या नंबरप्लेटची ए ते झेडपर्यंतची सिरीज संपल्याने आता नंबरप्लेटवर डबल ए अशी सिरीज वापरायला सुरुवात केली आहे.२ नोव्हेंबर १९८२ साली सिंधुदुर्गनगरी येथे प्रादेशिक परिवहन विभागाची स्थापना झाल्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत ए ते झेड या सिरीजमधील १ लाख १० हजार ८४४ मोटारसायकलची नोंद करण्यात आली. या वाहनामध्ये ७६ हजार ९४६ मोटारसायकल, २९०७७ स्कूटर व ४८२१ मोटेड (लुना) यांचा समावेश आहे. आता या गाड्यांची सिरीज ए ते झेडपर्यंत होती. ती आता संपल्याने जिल्ह्यात ए ए अशी सिरीज सुरु झाली आहे, असे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)