शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीच्या संशयाने युवकाची धुलाई

By admin | Updated: September 28, 2015 23:30 IST

तुम्ही ५० हजाराच्या तीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला १४ कोटी रूपये मिळणार आहेत. त्यासाठी एक-दोन कोरे चेक देण्यास सांगितले.

मालवण : चेक घेण्यास मालवणला पोहचलेल्या एका कंपनीच्या युवकाला नागरिकांनी यथेच्छ चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या साऱ्या प्रकाराची खातरजमा करून यात मोठे रॅकेट तर नाही ना? याचा शोध मालवण पोलीस घेत आहेत. भारत सरकारच्या इन्शुरन्सच्या लकी नंबरमध्ये आपली निवड झाली आहे. पॉलिसी नंबर दिल्यास मिळणार २ लाख ९८ हजारङ्घतर आज ५० हजारच्या तीन पॉलिसी काढल्यास १४ कोटी मिळणार असल्याचा दूरध्वनी मालवणातील संतोष लुडबे यांना आला. मात्र लुडबे यांनी आपण बाहेर असून थोड्या वेळाने फोन करण्यास सांगितले. औरंगाबाद येथून बोलणाऱ्या त्या महिलने पुन्हा फोन केला. पुन्हा फोन आल्याने हा भुलभुलैयाचा प्रकार असल्याचे संतोष लुडबे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या महिलेने आमचा माणूस कसालला येईल. त्याला चेक स्वरुपात रक्कम द्या आणि करोडपती व्हा असे सांगितले. काहीतरी भंपकपणा आहे असे ओळखूनही लुडबे यांनी कसाल गाठले. लुडबे यांनी कोणतीही पॉलिसी नसताना आपण फसविले जावून यासाठी खोटा पॉलिसी नंबर दिला. नंबर दिल्यानंतर ३५ हजार भरा त्यानंतर २ लाख ९८ हजार मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. शिवाय आपली भारत सरकारच्या लकी नंबर मध्ये निवड झाल्याने आपण लकी आहात. त्यामुळे तुम्ही ५० हजाराच्या तीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला १४ कोटी रूपये मिळणार आहेत. त्यासाठी एक-दोन कोरे चेक देण्यास सांगितले. त्यानंतर कसाल व मालवण येथे कंपनीच्या माणसाची प्रतीक्षा सुरु झाली. तथाकथित कंपनीचा माणूस पोहचला. मात्र त्यापूर्वीच कोणतरी फसवणुकीच्या इराद्याने येत असल्याची जाणीव झाल्याने लुडबे यांच्या सहकाऱ्यांनी त्या युवकास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, घटनेची नोंद रात्री उशिरापर्यत पोलिसात झाली नव्हती.फसवणुकीच्या या प्रकारामुळे अजूनही समाजात कशाप्रकारे फसविले जात आहे. ते उघड झाले. मात्र, यात लुडबे यांनी दाखविलेली हुशारी प्रकार उघडकीस कारणीभूत ठरली. (प्रतिनिधी)मी तर पगारी नोकर : युवकाची विनवणीपकडण्यात आलेला तो युवक यात आपला काहीही संबध नाही. मी खासगी इन्शुरन्सकडे कामास आहे. राजापूर तळगाव येथे माझे घर असून तीन महिन्यापूर्वी अकरा हजाराच्या पगारावर या कंपनीत नोकरीस आहे. आज कोल्हापूर येथील आमच्या वरिष्ठांनी सांगितल्या प्रमाणे चेक नेण्यासाठी मी आलो. कोणत्याही ग्राहकाकडून आपण रोख स्वरुपात पैसे घेतलेले नाहीत. कंपनीचा वा वरीष्टांचा कोणताही इरादा असल्याचा आपल्या माहिती नाही. आपण पगारी नोकर आहोत. माज्या राजापूर येथील घरात खातरजमा करावी अशी विनवणी तो युवक करत होता.