सावंतवाडी-दाणोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 13:07 IST2018-12-05T13:02:46+5:302018-12-05T13:07:03+5:30

सावंतवाडी तालुक्यातील दाणोली  येथे अभिषेक नारायण पांगम (25) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

youth get suicide in sindhudurg | सावंतवाडी-दाणोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी-दाणोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देसावंतवाडी तालुक्यातील दाणोली  येथे अभिषेक नारायण पांगम याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांचा पंचनामा सुरू असून आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.गेल्या दोन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील दाणोली  येथे अभिषेक नारायण पांगम (25) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. नातेवाईकांनी त्याला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालयात हलविले.  मात्र डाॅ. संदिप सावंत यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. पोलिसांचा पंचनामा सुरू असून आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच

गेल्या दोन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी आत्महत्या होत आहेत. सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या आरोंदा येथील सिद्धी सिद्धेश तारी (30) या विवाहितेने मंगळवारी दुपारी कुडाळ येथे रेल्वे खाली आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दाणोलीतील पांगम या तरुणाने आत्महत्या केली आहे.

Web Title: youth get suicide in sindhudurg