शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर वाढला, देवबागात पडझड, मासेमारीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:28 PM

सिंधुदुर्ग : मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गुरुवारी दिवसभर वाऱ्यांचा तडाखा बसला. समुद्रातही वाऱ्यांचा वेग वाढल्याने मोठमोठ्या लाटा किनाºयावर दुपारपर्यंत धडकत होत्या.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर वाढला, देवबागात पडझड मासेमारीवर परिणाम, पर्यटन व्यवसायावर परिणाम नाही

सिंधुदुर्ग : मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गुरुवारी दिवसभर वाऱ्यांचा तडाखा बसला. समुद्रातही वाऱ्यांचा वेग वाढल्याने मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर दुपारपर्यंत धडकत होत्या.  किनारपट्टी भागात वाऱ्याने घातलेल्या थैमानात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात देवबाग-भाटकरवाडी येथील अरुण भाटकर यांच्या जागेतील माड कृष्णाजी मनोहर भाटकर यांच्या घरावर कोसळल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील सदस्य बचावले. वादळी वाऱ्याचा परिणाम मासेमारी झाल्याचे सांगण्यात आले.मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गुरुवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला. समुद्राच्या लाटांचाही वेग वाढल्याने मासेमारी नौकांनी सुरक्षेच्यादृष्टीने किनारा गाठला होता. मात्र, याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाकडे वरिष्ठ कार्यालयाकडून कोणताही संदेश प्राप्त झाला नव्हता.

वाऱ्याचा जोर सायंकाळी काही प्रमाणात ओसरला. या वाऱ्याचा मासेमारीवर परिणाम झाला असला तरी पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला नाही. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणारी किल्ला प्रवासी होडी वाहतूक दिवसभर विनाअडथळा सुरु होती, असे बंदर विभागाकडून सांगण्यात आले.

वीज वितरणकडून खबरदारीमालवण शहरात दिवसभर सोसाट्याचा वारा वाहत असल्याने वीज वितरण कंपनीने खबरदारी घेतली होती. दुपारच्या सत्रात वीज वाहिन्यांवर माडाची झावळे व झाडाच्या फांद्याचा स्पर्श होत असल्याने स्पार्किंग होत होते. तसेच वारा असल्याने वीज वाहिन्यावर फांदी तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून वीज वितरणने वीज पुरवठा सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवला होता, असे वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमान