शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकारीही अपात्र ठरणार ?

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

आग्रा संस्थेची पदवीही वादात : जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाच्या बोगस पदवीनंतर आता केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा या ऐच्छिक हिंदी संस्थेमधून बी.एड. पदवी घेतलेल्या दापोलीच्या विस्तार अधिकाऱ्यांची पदवीही वादात सापडली आहे. २६ शिक्षकांना पदावनती देण्यात आल्यामुळे या कारवाईकडेही शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. अलाहाबाद विद्यापीठातून बी.एड. पदवी घेतलेल्या ५१ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कारवाई केली. त्यापैकी २६ जणांना त्यांच्या मूळ जागेवर म्हणजेच उपशिक्षक पदावर पदावनत केले. यामध्ये केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडालेली असतानाच आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानची बी.एड. पदवीही वादात अडकली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीप्रमाणे आग्रा केंद्रीय हिंदी संस्थानच्या बी.एड. पदवीची तपासणी केली आहे. त्यामध्ये दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांची शुक्रवारी चौकशी केली. त्यामध्ये शिंदे यांनी आग्रा येथील आपली बी.एड. पदवीची कागदपत्रे समितीसमोर सादर केली. शिंदे यांनी हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेची राष्ट्रभाषा पंडित ही पदवी घेतली. ही पदवी पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी मान्यता प्राप्त नाही. शिंदे यांनी पंडित पदवीनंतर केंद्रीय हिंदी संस्थान आग्रातून बी.एड. पदवी १९९९ ला मिळवली. पुन्हा त्यांनी २००४ ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी घेतल्याचे कागदपत्रांवरून पुढे आले आहे. आग्रा येथील संस्थेची पदवीही बोगस असल्याची माहिती पुढे येत असल्याने शिंदे अडचणीत आले आहेत. त्यामुळे अलाहबाद पदवीधरांप्रमाणे शिंदे यांच्यावरही कारवाई होण्याची चर्चा जोर धरत आहे. (शहर वार्ताहर)