शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच, नीलेश राणे यांचा थेट आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:50 IST

Local Body Election: 'भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही. माझे हात स्वच्छ आहेत'

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, हे रवींद्र चव्हाण यांचे विधान म्हणजे मित्रपक्षाला थेट धमकी आहे असे मी समजतो. मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच घडत आहे, असा माझा थेट आरोप आहे. ते आणि त्यांची माणसे यातून वाचणार नाहीत, अशा शब्दांत आमदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.मालवण येथे आमदार राणे यांनी शुक्रवारी (दि.२८) माध्यमांशी बोलताना म्हणाले, मला काहीतरी चुकीचे घडताना दिसले म्हणून मी आवाज उठविला. माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलत आहे. यानंतर माझ्यासोबत काय काय होणार आहे हेसुद्धा मला माहीत आहे. परंतु भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही. माझे हात स्वच्छ आहेत. मी तुमचे हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या आरोपांचे खंडन करताना राणे म्हणाले, परवानगी मागून त्यांच्या घरात गेलो. त्यांचा आक्षेप असता तर दरवाजा उघडला तेव्हाच मला थांबवले पाहिजे होते. मला या म्हटले आणि वारंवार मला ते बसायला सांगत होते. क्राईम सीन होत असताना आरोपी पकडून देणे म्हणजे गुन्हा नाही. केलेल्या गुन्ह्याची माफी मागायची सोडून आरोप करताना लाज वाटली पाहिजे. त्यांना हा विषय डायव्हर्ट करायचा आहे. मी हा विषय डायव्हर्ट व्हायला देणार नाही.चुकीच्या गोष्टी समजल्या त्या मी जनतेसमोर ठेवल्याउदय सामंत येऊन गेले यात काही चुकीचे होते तर तेव्हा का तक्रार केली नाही. मला काही चुकीच्या गोष्टी समजल्या त्या मी जनतेसमोर ठेवल्या. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्हाला आम्ही काही चुकीचे करत आहोत असे वाटत असेल तर तुम्ही पुढे का नाही आलात? तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. फोन टॅप करा. माझे लोकेशन ट्रेस करू शकता. एसपी दोन-दोन दिवस मालवणमध्ये बसत आहेत. पुरावे समोर आणा ना. तेव्हा तुमचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटपात बिझी होते. याचाही विचार करा.समोरच्यांनी साधा वकीलही पाठवला नाहीशिल्पा खोत यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात आज माझ्या वकिलांशी बोलणार आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिल्पा खोत यांच्या विरोधात कोर्टात गेलो आहे. काल कोर्टाची पहिली तारीख झाली. समोरच्यांनी साधा वकीलही पाठवला नाही. हा कुठचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास. आपला निवडणूक फॉर्म रद्द होणार हे माहीत असल्यामुळे त्यांनी वकील पाठविलेला नसल्याचे राणे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Rane blames Ravindra Chavan for Malvan's turmoil.

Web Summary : Nilesh Rane accuses Ravindra Chavan of causing unrest in Malvan. Rane claims Chavan's statement threatens alliance partners. He defends his actions, citing evidence of wrongdoing, and questions the silence of opponents like Uday Samant. Rane also addresses the Shilpa Khot caste certificate issue.