शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम हस्तांतरित करण्यामागे गौडबंगाल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:19 IST

Kankavli, MNS, Parshuram Upkar, sindhudurg, pwd महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच सावंतवाडी विभागाच्या उपअभियंत्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूकच नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम हस्तांतरित करण्यामागे गौडबंगाल काय ? सत्ताधाऱ्यांना एवढी घाई का ? : परशुराम उपरकर यांचा प्रश्न

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच या कामावर नियंत्रणासाठी दोन्ही विभागात उपअभियंताच नसल्याचे दिसून येत आहे. खारेपाटण विभागातील उपअभियंत्यांची कोल्हापूरला बदली झाल्यानंतर ते इकडे फिरकतच नाहीत. तर सावंतवाडी विभागाच्या उपअभियंत्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूकच नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे.खासदार, पालकमंत्री यांनी जनतेशी चालविलेला हा खेळ असून या साऱ्याकडे दुर्लक्ष करीत केवळ काम पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यात स्वारस्य असण्यामागे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने, निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यावर खासदार, पालकमंत्री यांचा भर असल्याचे दिसत आहे.

मुळात दोन महिन्यांपूर्वी खारेपाटण विभागाचे उपअभियंता अमोल ओटवणेकर यांची कोल्हापूरला बदली झाली. त्यांच्याकडे सांगली, सातारा विभाग आहे. तसेच खारेपाटण ते जानवलीपर्यंतच्या भागाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडेच आहे.मात्र, बदलीनंतर ते इकडे फिरकलेलेच नाहीत. तर सावंतवाडी विभागाचे उपअभियंता पाटील यांच्यानंतर येथे अधिकृत उपअभियंता देण्यात आलेले नाहीत. दोन्ही ठिकाणी केवळ कनिष्ठ अभियंताच काम पाहत आहेत. अशी दयनीय स्थिती असताना अधिकारी न देता काम पूर्ण करून ते हस्तांतरित करण्यासाठी घाई का ? असा प्रश्न उपरकर यांनी केला आहे.जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री, आमदारांचे दुर्लक्षपालकमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आठवड्यात दोन दिवस त्यांचे अधिकारी थांबतील असे सांगितले होते. मात्र, असे अधिकारी थांबल्याचे एकदाही दिसून आलेले नाही. मात्र, त्याबाबत सत्ताधाऱ्यांना सोयरसुतक नाही. लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रह धरत सागरी जलक्रीडासाठी परवानगी मिळवित ते सुरू केले. मात्र, शासनाने आता त्याला बंदी आणली. सत्ताधारी मंडळी लोकांच्या व्यवसायाशी खेळत आहेत. मात्र, जनतेच्या प्रश्नांबाबत या मंडळीना काहीच वाटत नाही. जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली केली.मात्र, जनतेच्या सोयीसाठी पर्यायी डॉक्टरही उपलब्ध केला नाही. असलेल्या डॉक्टरांची बदली करताना दुसरे डॉक्टर नसतील तर लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळणार? मात्र, जनतेच्या समस्यांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागKankavliकणकवली