शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

नितेश राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय ? : उपरकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 5:23 PM

Politics Sindhudurg : खासदार राऊतांशी मैत्री साधत त्यांच्याच पक्षातल्या आमदार दिपक केसरकरांना इडीची धमकी देणाऱ्या आमदार राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनितेश राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय ? : उपरकर यांचा सवाल महामार्गाच्या दूरावस्थेकडे लोकप्रतिनिधींचे सोईस्कर दूर्लक्ष 

कणकवली : एकाच व्यासपीठावर बसून आधी मैत्री साधायची. एकमेकांची स्तुती करायची, अशी कृती आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. परंतु खासदार राऊतांशी मैत्री साधत त्यांच्याच पक्षातल्या आमदार दिपक केसरकरांना इडीची धमकी देणाऱ्या आमदार राणेंच्या भूमिकेचे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या केविलवाण्या अवस्थेकडे सत्ताधारी आणि विरोधक असलेले लोकप्रतिनिधी सोईस्कर रित्या दूर्लक्ष करीत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला आहे.परशुराम उपरकर यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एकाच व्यासपीठावर आणि एकाच बाकावर बसून आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी मैत्री साधली.

परंतु त्यानंतर काहीच दिवसांनी आमदार राणे यांनी सावंतवाडी येथे जात आमदार दिपक केसरकरांना इडीची चौकशी लावण्याची धमकी दिली. यातून या साऱ्या लोकप्रतिनिधींचा स्वार्थी चेहरा समोर येत आहे. ही मैत्री केवळ स्वार्थासाठी होती. विकासासाठी नव्हती. जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा स्टंट होता, हे जनतेने आता ओळखून जावे.मुंबई - गोवा महामार्गाच्या गटारांची दूर्दशा झाली आहे. महामार्गालगतची शेती पाण्याखाली गेल्याने पिक कुसून गेले आहे. एस. एम. हायस्कूलसमोरील उड्डाणपूल मागील वर्षी खचून गेला होता. यावर्षीही तिच गत झाली आहे. महामार्गाची जमिन संपादन करण्यासाठी आणि महामार्ग हस्तांतर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तत्परतेने काम केले.

जागा संपादन न झालेल्या ठिकाणीही काम चालू करण्यासाठी दिलीप बिल्डकॉनची मदत केली. टोलनाके आपल्या मुलाला चालवायला देण्याचे त्यांचे नियोजन आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीकडे १५ वर्षे महामार्ग देखभालीसाठी असतो. त्यातील एक वर्ष असे पडझडीतच गेले आहे.

महामार्गाच्या मध्यभागी आणि बाजूला झाडे लावायची होती. पण तेही काम पूर्ण झाले नाही. अपुऱ्या कामांमुळे अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. महामार्ग कंपनीने देखभाल दुरुस्तीचे काम योग्य रितीने न केल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

नांदगाव येथे महामार्गालगत असलेल्या घरांत तर पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले आहे. दिलीप बिल्डकॉनला महामार्गाच्या या दुरावस्थेबाबत जाब न विचारता त्याची वकीली करतानाच हे लोकप्रतिनिधी दिसतात.महामार्गाच्या कामांसाठी निधी येतो. मग कामे अपुरी का राहतात? कारण महामार्गाच्या या दूरावस्थेकडे सत्ताधारी व विरोधक लोकप्रतिनिधी सोईस्कर दूर्लक्ष करत आहेत, असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे. तसेच आता केवळ निवेदनाने प्रश्न सुटणार नाहीत.

महामार्गाच्या प्रश्नांबाबत खासदार, आमदार, मंत्री यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला पाहिजे. तरच हे महामार्गाशी संबंधित असणारे प्रश्न चव्हाट्यावर येतील आणि सुटतील, असेही मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणParshuram Upkarपरशुराम उपरकर Nitesh Raneनीतेश राणे Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग