​Sindhudurg: लोकांना उत्तरं काय द्यायची; जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री नितेश राणेंनी प्रशासनाला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:13 IST2026-02-11T12:12:42+5:302026-02-11T12:13:38+5:30

मेडिकल कॉलेजच्या कारभारावर नीलेश राणे आक्रमक

What answers should be given to the people Guardian Minister Nitesh Rane slammed the administration in the District Planning Committee | ​Sindhudurg: लोकांना उत्तरं काय द्यायची; जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री नितेश राणेंनी प्रशासनाला झापले

​Sindhudurg: लोकांना उत्तरं काय द्यायची; जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्री नितेश राणेंनी प्रशासनाला झापले

​ओरोस: प्रशासकीय पातळीवर कामांचा आढावा घेतला जात नाही, निधीचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून लोक आम्हाला दोषी मानतात," अशा शब्दात पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनावर आपला तीव्र संताप व्यक्त केला. बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

​या बैठकीला आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रलंबित विकासकामे आणि आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवरून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मेडिकल कॉलेजच्या कारभारावर नीलेश राणे आक्रमक

​जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांवरून आमदार नीलेश राणे यांनी 'डीन'ना चांगलेच धारेवर धरले. "रुग्णांचे किमान निदान होणे तरी आवश्यक आहे, पण येथे साधी एकवाक्यता नाही," असे ते म्हणाले. मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातील अंतर्गत वादावर बोट ठेवत राणे संतापले. "तुम्ही इथे टेबल टेनिस खेळायला बसलात का? आपापसातील भांडणे मिटवा, अन्यथा पदे कशाला भरायची?" असा सवाल करत त्यांनी माणुसकीच्या भावनेतून काम करण्याचे आदेश दिले.

निधी नियोजनाचा फज्जा; पालकमंत्र्यांची नाराजी

​जिल्ह्याच्या विकासासाठी येणारा निधी वेळेत खर्च होत नसल्याचे समोर आल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. अधिकारी फील्ड व्हिजिट करत नसल्याने कामांचा दर्जा आणि प्रगती तपासली जात नाही, ही वस्तुस्थिती समोर आली. "प्रशासनाने तातडीने आढावा घेऊन निधीचे सुयोग्य नियोजन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल," असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.

Web Title : सिंधुदुर्ग: पालक मंत्री नीतेश राणे ने योजना के अभाव पर प्रशासन को फटकारा

Web Summary : सिंधुदुर्ग के पालक मंत्री नीतेश राणे ने जिला योजना समिति की बैठक में खराब योजना और लापरवाही के लिए प्रशासन की आलोचना की। जनप्रतिनिधियों ने विलंबित परियोजनाओं और स्वास्थ्य सेवा की कमियों के बारे में अधिकारियों से सवाल किए। विधायक नीतेश राणे ने मेडिकल कॉलेज के मुद्दों और निधि प्रबंधन विफलताओं को संबोधित करते हुए तत्काल सुधार और कार्रवाई की धमकी दी।

Web Title : Sindhudurg: Guardian Minister Nitesh Rane Reprimands Administration Over Lack of Planning

Web Summary : Guardian Minister Nitesh Rane criticized Sindhudurg's administration for poor planning and negligence during a district planning committee meeting. Public representatives grilled officials about delayed projects and healthcare flaws. MLA Nitesh Rane addressed medical college issues and fund management failures, demanding immediate improvements and threatening action.