Sindhudurg: हत्तीपकड मोहिमेबाबत लवकरच तोडगा काढू, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:38 IST2025-03-11T17:37:44+5:302025-03-11T17:38:35+5:30

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबविण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन ...

We will soon find a solution to the elephant capture campaign in the Tilari Valley Sarpanchs' hunger strike called off after the assurance of the Guardian Minister | Sindhudurg: हत्तीपकड मोहिमेबाबत लवकरच तोडगा काढू, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे

Sindhudurg: हत्तीपकड मोहिमेबाबत लवकरच तोडगा काढू, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सरपंचांचे उपोषण मागे

दोडामार्ग : तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबविण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी दिल्याने अखेर तालुक्यातील सरपंचानी सुरू केलेले उपोषण रात्री उशिरा मागे घेण्यात आले.

तिलारी खोऱ्यात हत्तींचा वाढता वावर पाहता ग्रामस्थांसह शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. येथे वावरत असणाऱ्या हत्तींच्या कळपात लहान पिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरीवर्गात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.

हत्तींच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी काजू बागायतीकडे पाठ फिरवल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वर्षभर मेहनत घेतलेले काजू पीक ऐन हंगामात हत्तींमुळे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला आहे.

 त्यामुळे या परिसरात हत्तीपकड मोहीम राबवा, अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्याने शुक्रवारपासून येथील वनविभाग कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती.

शेतकऱ्यांचा रोष

प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. रामानुजन यांनी उपोषणस्थळी भेट दिली असता त्यांच्यावर उपोषणकर्त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी एन. रामानुजन म्हणाले की, कर्नाटकातून हत्तीपकड मोहिमेतील तज्ज्ञ टीम या भागात आणण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून परवानग्या मिळताच ही मोहीम राबविणे शक्य होईल, असे त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले.

पालकमंत्र्यांकडून आश्वासन

सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करणार असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे व माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने रात्री उशिरा उपोषण मागे घेण्यात आले.

Web Title: We will soon find a solution to the elephant capture campaign in the Tilari Valley Sarpanchs' hunger strike called off after the assurance of the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.