शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र शांततेत मतदान : लोकसभेच्या तुलनेने टक्केवारी घसरली

By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST

कायदा सुव्यवस्था अबाधित! प्रचारप्रमुखाची यशस्वी जबाबदारी पार पाडली : राणे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. तिन्ही मतदारसंघात नियुक्त निवडणुकीच्या अधिकाऱ्यांनी तसेच सुरक्षा यंत्रणेने चोख कामगिरी बजावत राडे संस्कृतीला पूर्णविराम दिला. आघाडी आणि युतीच्या फाटाफुटीनेही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या मतदानात वाढ करण्याकडेच लक्ष दिले. त्यामुळे अनुचित प्रकार टळले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ च्या अनुषंगाने बुधवार १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तिन्ही मतदारसंघातून प्राप्त माहितीनुसार सरासरी ५६ टक्के मतदान झाले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याने जिल्ह्यात अंदाजे सरासरी मतदानाची टक्केवारी ६५ टक्केपर्यंत होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मतदानाच्या दिवशी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभय करगुटकर यावेळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, जिल्ह्यात आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. तिन्ही मतदारसंघांसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेने अतिशय चोख व्यवस्था पार पाडली. २६८ कणकवलीमध्ये २ लाख २३ हजार ९१० मतदार असून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ लाख ३४ हजार ३९२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची सरासरी टक्केवारी ६०.०२ टक्के आहे. २६९ कुडाळमध्ये २ लाख ४ हजार ८०५ मतदार असून एकूण ५८.१७ टक्के, २७० सावंतवाडीमध्ये २ लाख १९ हजार ३८ मतदार यापैकी १ लाख १२ हजार ४३१ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ५१.३३ आहे. एकूण तिन्ही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ६५ टक्के होईल असा अंदाज जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी व्यक्त केला. प्रचारप्रमुखाची यशस्वी जबाबदारी पार पाडली : राणेकणकवली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठ्या विश्वासाने प्रचारप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली होती. प्रचार प्रमुख म्हणून मी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे सर्व पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. हेच आपले यश आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी कणकवली तालुक्यातील वरवडे फणसवाडी येथील मतदानकेंद्रावर मतदान केल्यानंतर व्यक्त केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यात पंचरंगी लढती झाल्या. त्याचा फायदा काँग्रेसलाच होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर काँग्रेसच विजयी होईल.नीतेश राणे यांना मतदान करताना आपल्या काय भावना आहेत, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मतदान करून मी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. त्याशिवाय वडिलांचे कर्तव्यही पार पाडले आहे. नीतेश राणे या निवडणुकीत विजयी होऊन एक आदर्श आमदार म्हणून काम करतील, असा विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा आपल्याला विश्वास आहे, असेही नारायण राणे म्हणाले. (वार्ताहर)