शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

विनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:59 IST

लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .

ठळक मुद्देविनायक राऊत हेच पुन्हा खासदारकीचे उमेदवार !वैभव नाईक यांनी स्पष्ट केली भूमिका ; भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाची पार्शवभूमी

कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला असून कोणी काही बोलले तरी त्यात बदल होण्याचा प्रश्नच येत नाही. असे भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केली .कणकवली येथील विजय भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, मानसी मुंज, शहर प्रमुख शेखर राणे, तेजस राणे, सुजित जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख गीतेश कडू, तेजल लिंग्रज, साक्षी आमडोसकर, प्रतीक्षा साटम,अनुप वारंग, रीमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वैभव नाईक पुढे म्हणाले, शिवसेना व भाजप यांची निवडणुकीसाठी युती झाली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेना नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही निश्चितच समन्वय होईल. तसेच नाराज असलेल्यांची नाराजीही दूर केली जाईल.खासदार विनायक राऊत यांनी सक्षमपणे गेली पाच वर्षे काम केले आहे. केंद्रशासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या आहेत. नरेंद्र मोदिंच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवीत आहेत. तर पक्षाच्या आदेशावर काम करणारे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जाईल . असेही वैभव नाईक यावेळी म्हणाले.संदेश पारकरांशी आमचे घरगुती संबध !भाजप नेते संदेश पारकर यांच्याशी आमचे खूप वर्षांपासून घरगुती संबध आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांना भेटत असतो. विधानसभा निवडणूक समोर ठेवून आमची कोणतीही भेट नाही. सध्या आम्ही लोकसभेची तयारी करीत आहोत. तसेच युती झाल्यामुळे भाजप मधील नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सध्या तरी नाही. अशा शब्दात संदेश पारकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चचेर्बाबतचे स्पष्टीकरण आमदार वैभव नाईक यांनी यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान दिले.राणेंची भूमिका सतत बदलते !शिवसेनेचे खासदार तसेच आमदार निवडून येत असल्याने नारायण राणेंची खऱ्या अथार्ने अधोगती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची अधोगती झाली असे वक्तव्य त्यांनी करू नये. शिवसेना - भाजप युती झाल्यामुळे तसेच शिवसेनेच्या कामाच्या झपाट्यामुळे त्यांचा पक्ष खासदारकीच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांनी विनाकारण आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या कार्यसम्राट सुपुत्राची जाहीर केलेली उमेदवारी कायम ठेवावी आणि निवडणूक लढवावी. म्हणजे जनता त्यांना जागा दाखवून देईल.असे यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक