शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

अनंत म्हाडे : एकदिल अन् एकजुटीनेच दारूबंदीही जारी

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावातील तंटे सोडविण्याबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी विशेष भर देण्यात आला. गावामध्ये शांतता राखण्यात यशस्वी झाल्यामुळेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत तीन वर्षानंतर शांतता पुरस्कारासाठी ‘शेंबवणे’ गावाची निवड करण्यात आली आहे. गावातील ग्रामस्थ एकजुटीने, एकदिलाने विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. शिवाय गावात दारूबंदी करण्यात आली आहे. पुरस्कारामागे समस्त गावाचेच श्रेय असल्याचे ‘शेंबवणे’ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनंत म्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानास २००७ पासून सुरूवात झाली. या मोहिमेतंर्गत ८५१ ग्रामपंचायतीपैकी आतापर्यत १६ गावे शांतता पुरस्काराचे मानकरी ठरली आहेत. २०१० नंतर शांतता पुरस्कार जाहीर झाले नव्हते. मात्र या वर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गावाने १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. शेंबवणे गावाची लोकसंख्या ११३२ इतकी असून चार वाड्या आहेत. गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्याकडे तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला. विशेषत: गावात दिवाणी, महसूली तंटे नसल्यामुळे पोलिसस्थानकांतर्गत असलेले चार फौजदारी तंटे पोलिसांच्या मदतीने सोडविण्यात यश आल्याचे अनंत म्हाडे यांनी सांगितले. गेली दोन वर्षे म्हाडे तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषवित आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असला तरी सार्वजनिक उपक्रम म्हणून गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला आहे. गणेशोत्सवातंर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. हुंडा देणे व घेणे गुन्हा आहे, याचे समाज प्रबोधन करण्यात आले. गावातील मुलींबरोबर सुना देखील सुखाने नांदाव्यात यासाठी ‘हुंडाबंदी’ ला मान्यता देण्यात आली आहे.‘स्वच्छ गाव-सुंदर गाव’ संकल्पना ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येत असताना प्रत्येक वाडीत रॅली काढण्यात आली. घोषवाक्यांबरोबरच पथनाट्यातून स्वच्छतेसाठी प्रबोधन करण्यात आले. गावाने वाडीवार राबविलेल्या स्वच्छता अभियानात ग्रामस्थ उत्स्फूर्तरित्या सहभाग नोंदविला. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ मोहिमेतंर्गत गावात दोन बंधारे वर्षभरात बांधण्यात आले असल्याची माहिती म्हाडे यांनी दिली. शैक्षणिक उपक्रमातंर्गत गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे, वह्यांचे वाटप करण्यात आले. हुंडाबंदी, स्वच्छता, पाणी टंचाई बाबत समाजप्रबोधनाकरीता विद्यार्थी वर्गही सहभागी झाला होता. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रबोधन करण्यात येत असतानाच या कार्यक्रमांसाठी अनुदान देण्यात आले आहे. कोकणात गणेशोत्सव व होळीचा सण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शिवाय गावातील हौशे गवशे सहभागी होत असल्याने या दिवसात तंटे उदभवण्याची भिती सर्वाधिक असते. परंतु प्रत्येक सणापूर्वी पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गावात बैठका घेवून कार्यक्रम शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाल्यानेच गाव शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. प्रत्येक कार्यक्रमातील ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनिय असल्याने गावात शांतता नांदत असल्याचे म्हाडे यांनी सांगितले.मोहिमेंतर्गत ८५१ ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत १६ गावे शांतता पुरस्काराची मानकरी.यावर्षीच्या स्पर्धेत शेंबवणे गाव १९० पेक्षा अधिक गुण संपादन करून शांतता पुरस्काराचे मानकरी.गावातील तंटे गावपातळीवर सामोपचाराने मिटविण्यासाठी तंटामुक्त समितीने घेतला पुढाकार.