शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्स्प्रेसला कुडाळजवळ अपघात; दोन जनावरांना धडक, कोकण रेल्वेचा ‘खोळंबा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:13 IST

ओव्हरहेड वायर तुटल्याने साडेतीन तास वाहतूक ठप्प, आंगणेवाडीच्या भाविकांचे हाल

कुडाळ : कोकण रेल्वेच्या वेगवान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान जनावरांनी धडक दिली. या अपघातात दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, धडकेच्या तीव्रतेमुळे विजेचा खांब वाकून वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल साडेतीन तास जागीच खिळली, परिणामी प्रवाशांचे, विशेषतः आंगणेवाडीच्या भाविकांचे प्रचंड हाल झाले.मडगावच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ११:३० च्या सुमारास कुडाळजवळ आली असता रुळावर आलेल्या बैल आणि म्हशीला तिची जोरदार धडक बसली. एक जनावर ओव्हरहेड वायरच्या खांबावर आदळल्याने खांब वाकला आणि संपूर्ण मार्गाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. अखेर डिझेल इंजिनच्या सहाय्याने रेल्वे बाजूला करून दुरुस्ती करण्यात आली आणि दुपारी ३:०५ वाजता वाहतूक पूर्ववत झाली.

स्थानकांवर गाड्यांच्या रांगाविद्युत पुरवठा खंडित झाल्याने 'सुपरफास्ट' गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या होत्या.कुडाळ : मांडवी, उदना, जनशताब्दी एक्स्प्रेस.झाराप : राजधानी एक्स्प्रेस.सावंतवाडी : दुरांतो एक्स्प्रेस.कणकवली : मंगला एक्स्प्रेस.मडुरा : मरूसागर एक्स्प्रेस.

आंगणेवाडीच्या भाविकांचे हालसध्या आंगणेवाडी जत्रेचा परतीचा प्रवास सुरू आहे. हजारो भाविक स्थानकांवर परतीच्या प्रवासासाठी थांबले असतानाच हा अपघात झाला. रणरणत्या उन्हात लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना साडेतीन तास ताटकळत राहावे लागले. यामुळे स्थानकांवरील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी उसळली होती.

रेल्वेचे मोठे नुकसानवंदे भारत : रेल्वेच्या दर्शनी भागाचे (Front Nose) मोठे नुकसान झाले आहे.विद्युत खांब : जनावराच्या धडकेने लोखंडी खांब वाकल्याने रेल्वे तंत्रज्ञाना तो दुरुस्त करताना मोठी कसरत करावी लागली.इंजिन बदल : विद्युत पुरवठा नसल्याने अखेर डिझेल इंजिन मागवून वंदे भारतला घटनास्थळावरून हलवावे लागले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Express Hit Animals Near Kudal; Rail Traffic Disrupted

Web Summary : Vande Bharat Express struck animals near Kudal, killing two and disrupting rail traffic for 3.5 hours. An overhead wire pole was damaged, halting trains and inconveniencing passengers, especially Anganewadi pilgrims. Services resumed after repairs using a diesel engine.