पेट्रोल पंपावर डल्ला मारुन चोरट्यांनी काढला पळ, तीन तासात वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 17:56 IST2022-01-01T17:53:50+5:302022-01-01T17:56:05+5:30

ओरोस येथील पंपावर चोरट्यांनी डल्ला मारला. व ते पळाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देत अलर्ट केले. सर्वत्र नाकाबंदी केली.

Vaibhavwadi police arrested the thieves | पेट्रोल पंपावर डल्ला मारुन चोरट्यांनी काढला पळ, तीन तासात वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पेट्रोल पंपावर डल्ला मारुन चोरट्यांनी काढला पळ, तीन तासात वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वैभववाडी  : पहाटे ओरोस येथील सिद्धी पंपावर चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांना करूळ चेक नाक्यावर जेरबंद करण्यात आले आहे. पाच आरोपींच्या तीन तासात मुसक्या वैभववाडी पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सतर्कतेमुळे वैभववाडी पोलिसांना हे यश मिळाले आहे. सर्व आरोपी घाटकोपर येथील आहेत.

आरोपींकडे 57 हजार रुपये रोकड व 30 चोरीचे मोबाईल आढळून आले आहे. ही घटना करूळ चेक नाक्यावर घडली आहे. आज पहाटे 6 वाजता ओरोस येथील पंपावर चोरट्यांनी डल्ला मारला. व ते पळाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलिस ठाण्यात याबाबत माहिती देत अलर्ट केले. सर्वत्र नाकाबंदी केली.

करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेल्या व्ही. एम. कांबळे व एस.ए. तांबे यांनी एक कार अडवली. दरम्यान पोलिस निरीक्षक अतुल जाधव व फौजफाटा चेक नाक्यावर दाखल झाला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस हवालदार विलास राठोड, एन. एस. खाडे, पडीलकर, एम. के. राणे, कांबळे, एस.टी. शिंदे, संदीप राठोड, एस.ए. तांबे, जायभाय घटनास्थळी दाखल झाले. गाडीतील सर्व आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रोख रक्कम व चोरीचे मोबाईल आढळून आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.

Web Title: Vaibhavwadi police arrested the thieves