शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

..तोपर्यंत बील भरणार नाही

By admin | Updated: August 4, 2015 00:03 IST

कवठणी ग्रामस्थांचा मोर्चा : वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा

कुडाळ : जोपर्यंत कवठणी गावातील सर्व विद्युत मीटरांची तपासणी केली जात नाही व येथील विद्युत पुरवठ्यासंदर्भातील समस्या सोडवून वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही, तोपर्यंत कवठणी गावातील कोणताही ग्राहक वीजबिल भरणार नाही, असा आक्रमक पवित्रा कवठणी येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी घेतला. कुडाळ येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी घेत मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण कवठणी गाव येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही यावेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील गेले कित्येक महिने वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिल येत आहे. तसेच विद्युत खांब बदलण्याकरिता गावात खड्डे मारण्यात आले. मात्र, विद्युत खांब अजूनही टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये जनावरे पडण्याची तसेच मानवी जिवितास धोका निर्माण झाला आहे. गावात अनेकवेळा विद्युत पुरवठा सुरळीत नसतो. काही ठिकाणी विद्युत तारा खाली आलेल्या आहेत. ज्याठिकाणी धोकादायक वी खांब आहेत, ते खांब बदलण्यात आलेले नाहीत. गावात वायरमन नाहीत. अशा अनेक समस्यांमुळे कवठणी ग्रामस्थ त्रस्त आहेत. या समस्यांमुळे येथील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिलामुळे आर्थिक भुर्दंड पडत आहे. या सर्व समस्यांबाबत कवठणी येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी वारंवार येथील एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा कळविले. मात्र, या सर्व समस्यांकडे एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. यामुळे कवठणी गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी कुडाळ येथील एमएसईबीच्या जिल्हा कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात कवठणीचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर, कवठणी सरपंच सुमन कवठणकर, सावंतवाडी काँग्रेस उपतालुकाध्यक्ष शेखर गावकर, कवठणी उपसरपंच नीतेश कवठणकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर, आनंद शिरवलकर, रुपेश पावसकर, राकेश कांदे, सद्गुरू कवठणकर, अजित कवठणकर, प्रकाश कवठणकर, रवींद्र कवठणकर तसेच कवठणी गावातील सुमारे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने वीज वितरणचे कार्यकारी अभियंता एस. आर. बांबळे यांची भेट घेतली व कवठणी गावातील विद्युत पुरवठा, वाढीव बिलासंदर्भात चर्चा केली. यावेळी सुधन कवठणकर यांनी वाढीव बिल तपासावे, नवीन विद्युत खांब लावावेत, पाणथळ जमिनीतील धोकादायक खांब बदलावेत, वायरमन दोन दिवसात द्यावा, काम न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, तीन महिन्यांनी वीज बिले द्यावीत, अशा मागण्या यावेळी कवठणी ग्रामस्थांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केल्या. शेवटी अधिकारी बांबळे व सहाय्यक व्यवस्थापक रोहिदास राऊत यांनी कवठणी गावच्या सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)सातार्डा की, कवठणी यावरून वादंगयावेळी सातार्डा येथील बंद पथदीपांचे काम अगोदर करा, असे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर यांनी अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर माजी सरपंच सुधा कवठणकर यांनी प्रकाश कवठणकर यांना विरोध करत सातार्ड्यात नाही, तर अगोदर कवठणी येथील पथदीपांचे काम करा. त्यांचे सरपंच, उपसरपंच बोलावूनही आले नाहीत. त्यामुळे कवठणीच्याच पथदीपांचे काम अगोदर करा, असे सांगितले. यावरून प्रकाश कवठणकर व सुधा कवठणकर यांच्यात अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातच वाद झाले. आता बेमुदत उपोषण क ोकणात वीजचोरी नाही, वीज बिल वसुली १०० टक्के असूनही वीज वितरण कंपनी व अधिकारी कोकणातील जनतेला नाडतात. आमचे हे आजचे आंदोलन शांततामय आहे. पण मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण गावच याठिकाणी उपोषणास बसेल, असा इशाराही यावेळी सुधन कवठणकर यांनी दिला.