..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:38 PM2022-08-12T13:38:59+5:302022-08-12T13:53:09+5:30

भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली.

Union Home Minister Ajay Kumar Mishra criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray | ..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

..पण 'हे' त्यांच्याच कर्माचे फळ, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

googlenewsNext

सुधीर राणे

कणकवली : ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी, सीबीआय वगैरे संस्थांच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती अवैध होती. ती अवैध मार्गाने मिळवलेली होती. तीच जप्त केली गेली आहे असे स्पष्ट मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी व्यक्त केले.

राणे कुटुंबीयांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आज, शुक्रवारी सदिच्छा भेट दिल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मिश्रा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला केले. त्याचेच फळ त्यांना आता मिळतेय. त्यांनी जे लोकांसोबत केले. ज्या प्रकारे विश्वासघात केला. तसेच त्यांच्यासोबतही घडतेय. त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचेच फळ आहे.

सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप नाही

खासदार संजय राऊत किती बोलत होते, आता तर जेल मध्ये आहेत. ईडीने त्यांच्याकडील अवैध मालमत्ता जप्त केली. असेच लोक भाजपविरोधात बोलत आहेत. पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमचे सरकार, आमचा पक्ष  कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत.

भाजपने नितीशकुमारांना हटवले नाही

महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार बनवण्यात आले. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना हटवले नाही असेही ते म्हणाले.

भाजपसाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत

भारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारी करत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे असे म्हणत त्यांनी भाजपचा येत्या काळातील उद्देश स्पष्ट केला.

जे.पी.नड्डांच्या वक्तव्याचा विपर्यास

जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी अस सांगितले होते की,जर प्रादेशिक पक्ष जनतेसाठी देशपातळीवरच्या सर्व प्रकारच्या योजना राबिण्यासाठी तयार नसतील आणि सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत पोचत नसतील तर निश्चितपणे याचे नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल. असेही केंद्रीय मंत्री मिश्रा यावेळी म्हणाले.

Web Title: Union Home Minister Ajay Kumar Mishra criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.