भोंदुबाबा खरातप्रकरणी दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, सावंतवाडीत उद्धवसेनेचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:52 IST2026-03-25T19:51:46+5:302026-03-25T19:52:26+5:30

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग ) : नाशिक येथील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्याने सावंतवाडीत ...

Uddhav Sena demands resignation of Deepak Kesarkar in Bhondubaba Kharat case in Sawantwadi | भोंदुबाबा खरातप्रकरणी दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, सावंतवाडीत उद्धवसेनेचा एल्गार

भोंदुबाबा खरातप्रकरणी दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, सावंतवाडीत उद्धवसेनेचा एल्गार

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : नाशिक येथील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात शिंदेसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्याने सावंतवाडीत राजकीय वातावरण तापले आहे. केसरकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उद्धवसेनेने आज शहरात जोरदार मोर्चा काढत केसरकरांविरोधात एल्गार पुकारला.

विधानसभा क्षेत्र प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात खरात आणि केसरकर यांचे फोटो असलेले बॅनर झळकवण्यात आले. मंत्री असताना केसरकर स्वतः या भोंदुबाबाकडे जात होते, हे त्यांनीच मान्य केले आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रवृत्तीला राजाश्रय देणे चुकीचे असल्याचे उद्धवसेनेने म्हटले आहे. प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत, या प्रकरणाची एसआयटीद्वारे निष्पक्ष आणि कसून चौकशी व्हावी, असे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले आहे.

केसरकरच सूत्रधार

भोंदुबाबा खरात याला राजकीय पाठबळ देण्याचे काम केसरकर यांनीच केले असून, या प्रकरणाचे खरे सूत्रधार तेच आहेत, असा गंभीर आरोप रुपेश राऊळ यांनी केला. पीडित महिलांना न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे, यासाठी ही लढाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Uddhav Sena demands resignation of Deepak Kesarkar in Bhondubaba Kharat case in Sawantwadi