शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन, दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेध; ९० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:07 IST

‎वैभव नाईक यांच्यासह पदाधिकारी ताब्यात; गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात आणि गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी बुधवारी माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने हुमरमळा येथे ‘चक्काजाम’ आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्या वैभव नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.सकाळी ११ वाजता हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत महाविद्यालयासमोर राणे स्टॉप येथे उद्धवसेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. येथे उभारलेल्या व्यासपीठावर पदाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या कामातील विलंबामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोईवर आवाज उठवला.माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, माजी उपसभापती जयभारत पालव, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, सुशील चिंदरकर यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते.सरकारकडून दिशाभूलमाजी आमदार वैभव नाईक यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका करत म्हटले की, महामार्गाचे काम ९८ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जातो. परंतु, अनेक उड्डाणपूल आणि पुलांची कामे अजूनही बाकी आहेत. त्यामुळे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. त्यांनी महामार्ग त्वरित दुरुस्त न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

दुधाचा अभिषेक, रांगोळी काढून निषेधआंदोलानादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी महामार्गावर ठाण मांडले. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी महामार्गाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ दुधाचा अभिषेक केला. महिला कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध करत रांगोळी काढली. महामार्ग अधिकाऱ्यांनी २५ ऑगस्टपूर्वी आवश्यक दुरुस्ती करण्याची ग्वाही दिल्यानंतर पोलिसांनी वैभव नाईक यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.सुमारे ९० जणांवर गुन्हा दाखलहुमरमाळा येथे महामार्ग अडविल्याप्रकणी उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह सुमारे ९० जणांवर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.