शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे केबल चोरीप्रकरणातील आणखी दोन आरोपी अटकेत, कणकवली पोलिसांची कारवाई

By सुधीर राणे | Updated: July 17, 2024 11:50 IST

कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील  २ ...

कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील  २ लाख ३४ हजार किंमतीचे तांब्याच्या  तारेचे बंडल व  कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी सातारा येथून आणखीन दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संतोष सावकार जाधव (वय-२३) व श्रीकांत सावकार जाधव (२२, दोघे रा. तासगाव, सांगली) अशी त्यांची नावे असून या दोघांना सातारा येथून ताब्यात घेण्यात आले.यापूर्वी या चोरीप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी (४०, रा, कोडोली, ता.पन्हाळा) या भंगार विक्रेत्या संशयिताला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडीही ताब्यात घेतली आहे. हंबीरराव याला न्यायालयाने १८ जुलै पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.ही चोरीची घटना २२ जून रोजी सायंकाळी ७.३० ते २४ जून सकाळी ९ या मुदतीत घडली होती. याबाबतची तक्रार त्या वर्कशॉपमधील रेल्वेचे विभागीय वरिष्ठ अभियंता संजीवकुमार बेलवलकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत. या चोरी प्रकरणातील आणखीन काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीKankavliकणकवलीPoliceपोलिसSangliसांगली