वीज पडल्याने दोन बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:07 IST2019-07-18T17:05:16+5:302019-07-18T17:07:27+5:30
कणकवली तालुक्यातील नाटळ येथील दीनानाथ पंढरी सावंत यांच्या दोन बैलांवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यामुळे दीनानाथ सावंत यांचे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीज पडल्याने दोन बैल ठार
कणकवली : तालुक्यातील नाटळ येथील दीनानाथ पंढरी सावंत यांच्या दोन बैलांवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने ते जागीच गतप्राण झाले. त्यामुळे दीनानाथ सावंत यांचे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दीनानाथ सावंत यांनी रविवारी सायंकाळी आपल्या दोन बैलांना चरण्यासाठी सोडले होते. यावेळी बैलांवर अचानक वीज कोसळली. त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यातील एका बैलाची ३० हजार तर दुसऱ्या बैलाची ३५ हजार रुपये किंमत होती.
ऐन शेतीच्या हंगामात सावंत यांचे बैल गतप्राण झाल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. या घटनेची माहिती समजताच तलाठी तसेच महसूलच्या पथकाने पाहणी करून पंचयादी घातली. या घटनेची नोंद कणकवली तहसील कार्यालयात करण्यात आली आहे.
दरम्यान, कणकवलीत बुधवारी पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.