इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:50 AM2019-03-02T11:50:52+5:302019-03-02T11:53:14+5:30

जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा आत्मविश्वासपूर्वक मायबोली मराठीतूनच छान संवाद साधत एखाद्या व्यवसायाकडे वळा, असे आवाहन अमेरिका स्थित व सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू प्रतिबंध अभियानचे अध्यक्ष डॉ. अनिल नेरुरकर यांनी तळेरे येथे केले.

 Turn on business to better business than English: Anil Nerurkar | इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर 

इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर 

Next
ठळक मुद्दे इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर  सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आयोजित मराठी भाषा दिन

तळेरे : जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा आत्मविश्वासपूर्वक मायबोली मराठीतूनच छान संवाद साधत एखाद्या व्यवसायाकडे वळा, असे आवाहन अमेरिका स्थित व सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू प्रतिबंध अभियानचे अध्यक्ष डॉ. अनिल नेरुरकर यांनी तळेरे येथे केले.

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ व स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्यासंयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त तळेरे येथील दळवी महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसुदन नानिवडेकर, कॅप्टन निलिमा प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक पंचायत समिती जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, कोमसाप कणकवली शाखेचे अध्यक्ष तथा स्पर्धा परीक्षक रवींद्र मुसळे, परिक्षक तथा कवि व लेखक प्रमोद कोयंडे, दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट तळेरेचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशोक मुद्राळे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरेच्या संचालिका  श्रावणी सतिश मदभावे, ग्रंथपाल मिनेश तळेकर, राधिका खटावकर व जाकिर शेख यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  Turn on business to better business than English: Anil Nerurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.