शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनवादी चळवळ एका छताखाली

By admin | Updated: July 7, 2015 21:14 IST

आठ चळवळींचा निर्णय : युवक, विद्यार्थ्यांनाही सामावून घेणार

सावंतवाडी : जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ‘आम्ही भारतीय’ या विचारमंचाखाली एकत्र येण्याचा निर्णय येथे आयोजित केलेल्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. येथील श्रीराम वाचन मंदिरात रविवारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची चळवळ झाली. यावेळी राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानवमुक्ती लढा, सत्यशोधकसमिती, विवेक वाहिनी, श्रीराम वाचन मंदिर, मुक्तांगण, तसेच शिक्षक वाङमय, आदी संघटना ‘आम्ही भारतीय’ या अनौपचारिक विचारमंचात एकत्र आल्या होत्या. यासंदर्भात पाचजणांची अस्थायी समिती स्थापन करण्यात आली. यात अ‍ॅड. संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. विनोदसिंह पाटील, डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. आर. के. संकपाळ यांचा समावेश आहे. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. काजरेकर यांनी केले. त्यांनी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा स्तरावर एकत्र येण्याची संकल्पना मांडली. त्यावर उपस्थितांनी विविध मते मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सर्वानुमते ‘आम्ही भारतीय’ या नावाने विचारमंच स्थापन करून चळवळ पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाचे प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी आपण राबविलेले दृष्टिकोन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर यासंबंधी माहिती दिली. तरुण पिढी चांगल्या मार्गाकडे वळावी. ती गोंधळली की, राजकीय मंडळी याचा फायदा घेतात, असे मत मांडले. त्यानुसार महाविद्यालयीन पातळीवर मुलांशी संवाद साधून त्यांना चळवळीत सहभागी करून घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, साठे साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अ‍ॅड. संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. आर. के. संकपाळ, डॉ. गोविंद काजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला मंगल परुळेकर, डॉ. शरयू आसोलकर, अप्पाजी गावडे, शशी नेवगी, वीरधवल परब, सचिन देसाई, प्रा. देविदास बोर्डे, लीलाधर घाडी, राजेंद्र कांबळे, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रा. एल. पी. पाटील, सुनील भिसे, डॉ. जी. ए. बुवा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)