Sindhudurg: भरदिवसा घरात घुसून वृद्धावर हल्ला करत चोरट्याने सोनसाखळी लंपास केली, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:35 IST2025-04-01T14:34:40+5:302025-04-01T14:35:08+5:30

वैभववाडी( सिंधुदुर्ग ): नापणे धनगरवाडा येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर यांच्यावर घरासमोरील अंगणात अज्ञात चोरट्यांने हल्ला करुन अंगावरील दागिने लंपास ...

Thief attacks elderly man in broad daylight steals gold chain in Vaibhavwadi | Sindhudurg: भरदिवसा घरात घुसून वृद्धावर हल्ला करत चोरट्याने सोनसाखळी लंपास केली, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Sindhudurg: भरदिवसा घरात घुसून वृद्धावर हल्ला करत चोरट्याने सोनसाखळी लंपास केली, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

वैभववाडी(सिंधुदुर्ग): नापणे धनगरवाडा येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभूलकर यांच्यावर घरासमोरील अंगणात अज्ञात चोरट्यांने हल्ला करुन अंगावरील दागिने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता.१) सकाळी ७.३० वा. घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नापणे धनगरवाडा येथे प्रभुलकर यांचे घर आहे. सकाळी ते अंगणात असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या कुंपणाच्या प्रवेशद्वाराने आत आला. प्रभुलकर यांना काही कळण्याच्या आतच त्याने लाकडाने त्यांच्यावर हल्ला केला. मारहाणीनंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन चोरटा दुचाकीवरुन पसार झाला आहे. 

या हल्ल्यात प्रभूलकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर, अभिजित तावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ठसे तज्ञांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले. सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Thief attacks elderly man in broad daylight steals gold chain in Vaibhavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.