शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गातील जनतेला फक्त आश्वासने देवून फसविले, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: September 15, 2023 15:42 IST

..तेव्हा श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे आता कोठे गेले?

कणकवली: मागील १५ वर्षे सर्व सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला फक्त विविध आश्वासने देवून सातत्याने फसवले आहे. विकासाच्या फक्त मोठ्मोठया वलग्नाच करण्यात आल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी पुढे पुढे करणारे आणि आपसात भांडणारे अनेक राजकीय नेते होते. तर अनधिकृतरित्या विमान उडवून एका  माजी पालकमंत्र्यांनी आणि केंद्रीय उद्योगमंत्र्यांनीही स्वतः श्रेय घेण्यासाठी चढाओढ केली. सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही गणेशोत्सवात चिपी वरून नियमित विमानसेवा सुरू राहील हे फसवे आश्वासन दिले. मात्र, विमान सेवा ठप्प झाल्यावर तेव्हा श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे आता कोठे गेले?सध्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण असो किंवा खासदार विनायक राऊत अथवा स्थानिक आमदार या सर्वांनी जनतेची फसवणूक केली आहे. पालकमंत्र्यांनी गणेशोत्सवापूर्वी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आच्छादन घालण्याचे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे गणेशचतुर्थीला रेल्वेने येणारे गणेशभक्त पावसात भिजत गावी पोहोचणार आहेत. तसेच सुशोभीकरणाचे कामही सुरू झालेले नाही. भाजप जिल्हाध्यक्षानी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी  २० कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रस्ते खड्डेयुक्त असल्याचे मान्य केले. जिल्ह्यातील ठेकेदारांनी केलेल्या कामांची ७० ते८० कोटी रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे  विकासाच्या गप्पा मारणारे जनतेला फसवत आहेत.महामार्गाची एक लेन जरी चालू केली असली तरी अन्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात बांधकाम विभाग प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता दिसून येते. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हयात शासकीय रुग्णालयात डॉक्टर नाहीत, गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. याकडे कोणीच पाहत नाहीत. त्यामुळे पालकमंत्री हे कशासाठी आहेत? फक्त स्वतःच्या विकासासाठी आहेत का? असा प्रश्न पडतो. जिल्ह्याच्या दृष्टीने विचार करता पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री हे दोन्ही निष्क्रिय ठरले असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर