सिंधुदुर्गात खऱ्या शिवसेनेची ताकद काय हे दाखवणार!, मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:13 IST2022-08-19T16:12:54+5:302022-08-19T16:13:32+5:30

कणकवली: येत्या आठ- दहा दिवसात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा येणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजे आमच्या खऱ्या ...

The real strength of Shiv Sena will be shown in Sindhudurga, Minister Uday Samant warning | सिंधुदुर्गात खऱ्या शिवसेनेची ताकद काय हे दाखवणार!, मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

सिंधुदुर्गात खऱ्या शिवसेनेची ताकद काय हे दाखवणार!, मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

कणकवली: येत्या आठ- दहा दिवसात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा येणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणजे आमच्या खऱ्या शिवसेनेची सिंधुदुर्गात ताकद काय आहे हे दाखवून देणार आहे. असा सूचक इशारा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज, शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांचे शिंदे समर्थक शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात प्रथमच आलेल्या सामंत यांच्या स्वागतावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, शेखर राणे, अतुल दळवी, सतीश हरमलकर, बाबू आचरेकर, सुनील पारकर, नाना सापळे यांच्यासह अनेक शिंदे समर्थक शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: The real strength of Shiv Sena will be shown in Sindhudurga, Minister Uday Samant warning