शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

चीपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न लवकरच सुटणार, जिल्हा नियोजनमधून २ कोटींचा निधी

By सुधीर राणे | Updated: April 22, 2025 16:41 IST

वीज वितरणची प्रशासकीय मान्यता; विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली

कणकवली : गेल्या तीन वर्षांपासून चीपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित वीज वाहिन्या शिफ्टिंग व रूपांतरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून दोन कोटी ३७ लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नाईट लँडिंगची समस्या  सुटणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. वीज वितरणने प्रशासकीय मान्यता दिली आहे.महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यानी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील पाट फिडरकडून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनच्या शिफ्टींग व रूपांतरणासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर करण्यात आला होता. चिपी विमानतळ सुरू होवून तीन वर्षे उलटून गेली तरी याठिकाणी नाईट लँडिंगचा प्रश्न रेंगाळला होता. तसेच विमानतळावर विद्युतीकरणाच्या अनुषंगाने अनेक समस्याही प्रलंबित होत्या. यासाठी वीज कंपनीच्या पाट येथील फिडरकडून वीज पुरवठा होत असताना ११ केव्हीच्या मुख्य लाईनच्या शिफ्टिंगसाठी मोठा खर्च होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी व प्रशासकीय मान्यतेसाठीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यात अंतर्गत विद्युतीकरण, वाढीव पथदिवे, अंतर्गत उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, लघुदाबाच्या विजवाहिन्या उभारणे, नवीन रोहित्र  क्षमता वाढवणे आदी कामांचा समावेश आहे. या कामाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तांत्रिक मान्यता देत निधीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीने २ कोटी ३७ लाखांच्या उपलब्धतेसाठी मान्यता दिली होती. यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहेत. या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे तातडीने हे काम सुरू होणार आहे.बंद विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न!चिपी विमानतळावर बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी फ्लाय ९१ च्या अधिकाऱ्यांशी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी येथील विजेची समस्या मिटविण्यासाठीच्या  कामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता चिपी विमानतळावरून जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करण्यासाठी मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत.नाईट लँडिंगचा प्रश्न निकाली लागेल!चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली तरी  आवश्यक विद्युतीकरणाच्या अभावामुळे नाईट लँडींगचा मोठा प्रश्न होता. मात्र, आता विजेची समस्या मिटविण्यासाठी निधी मंजूर झाल्यामुळे भविष्यात येथील नाईट लँडिंगचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAirportविमानतळelectricityवीजguardian ministerपालक मंत्रीNitesh Raneनीतेश राणे Planning Commissionनियोजन आयोगfundsनिधी