कणकवली बसस्थानकासमोर आढळला अनोळखी वृद्धाचा मृतदेह
By सुधीर राणे | Updated: August 29, 2022 13:12 IST2022-08-29T13:11:40+5:302022-08-29T13:12:12+5:30
ऐन सणासुदीच्या तोंडावरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कणकवली बसस्थानकासमोर आढळला अनोळखी वृद्धाचा मृतदेह
कणकवली: कणकवली येथील बसस्थानकासमोर एका हॉटेलनजीक एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत वृद्ध अंदाजे ६५ वर्षीय असल्याचा अंदाज आहे. काल, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा मृतदेह आढळला. ऐन सणासुदीच्या तोंडावरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील २२ वर्षीय युवतीचाही मृतदेह बागेमध्ये आढळून आला आहे.
मृत वृद्ध व्यक्ती काल, रविवारी दुपारनंतर या परिसरात काही जणांना दिसली होती. रात्री उशिरा त्यांच्या शरीराची काहीच हालचाल न दिसल्याने एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता ती व्यक्ती मृत झाल्याचे लक्षात आले. मृत व्यक्तीस कुणी ओळखत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.