कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू
By सुधीर राणे | Updated: December 22, 2023 16:52 IST2023-12-22T16:51:41+5:302023-12-22T16:52:03+5:30
कणकवली : कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमीनजीक नळयोजनेच्या जॅकवेलजवळ गड नदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांकडून त्याची ...

कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू
कणकवली : कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमीनजीक नळयोजनेच्या जॅकवेलजवळ गडनदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तरुण मृतावस्थेत गडनदी पात्रामध्ये बेवारस स्थितीत काही नागरिकांना शुक्रवारी दिसून आला. त्यांनी कणकवली पोलिसांना तत्काळ कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या मृतदेहाची पाहणी केली.
दरम्यान, त्या तरुणाबद्दल तसेच त्याच्या नातेवाईकांबद्दल नागरिकांना काही माहिती असल्यास कणकवली पोलिस ठाणे, येथील संपर्क क्रमांक०२३६७-२३२२०३३, पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग०२३६२-२२८२०० तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले (९८२३४२६७०३), कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव( ९२७३९२६४२०) व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.