कणकवली तेलीआळी येथे टेम्पोला आग ! मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:39 IST2020-11-14T17:36:00+5:302020-11-14T17:39:00+5:30
kankavli, fire, sindhudurgnews कणकवली येथील तेलीआळीतील सावंत कंपाउंड मधील उभ्या टेम्पोला शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कणकवली नगरपंचायतच्या मिनी अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

कणकवली तेलीआळी येथील सावंत कंपाउंड मध्ये उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागली.
कणकवली : कणकवली येथील तेलीआळीतील सावंत कंपाउंड मधील उभ्या टेम्पोला शनिवारी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कणकवली नगरपंचायतच्या मिनी अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
कणकवली तेली आळीतील सावंत कंपाउंड मध्ये जमदाडे या भाजीविक्रेत्याचा टेम्पो उभा असतो . त्या परिसरात गवत आहे. या गवताला कोणी तरी आग लावलेली होती. ती आग हळूहळू उभ्या टेम्पो नजीक आली. त्यामुळे काहि क्षणातच टेम्पोला आगीने वेढले. या आगीची माहिती समजताच मनसेचे पदाधिकारी संतोष सावंत यांनी तत्काळ नगरपंचायतला त्याबाबत कल्पना दिली.
त्यानंतर अग्निशामक बंब घेऊन नगरपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नाने अग्निशामक बंबाने टेम्पोला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी टेम्पोच्या हौद्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने टेम्पोचे टायर आणि इंजिन व चालक केबिन सुरक्षित राहिली.
कणकवली नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे , गणेश लाड , सदानंद ताम्हाणेकर , विनोद जाधव आणि मिथुन ठाणेकर यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.