करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 19, 2022 11:29 IST2022-07-19T11:28:54+5:302022-07-19T11:29:30+5:30

काही महिन्यांपूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते

Teacher Prashant Bhat passed away due to heartattack | करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन

करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट (५२ रा. कोल्हापूर आर.के. नगर ) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने आज, मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. भाट यांना शनिवारी (दि.१६) अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी शिक्षकांनी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर या संस्थेत गेली वीस वर्षे ते कार्यरत होते. संस्थेतील कोल्हापूर, सडुरे, तिसंगी व करूळ या चारही शाखेत त्यांनी सेवा बजावली होती. काही महिन्यांपूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख होती.

Web Title: Teacher Prashant Bhat passed away due to heartattack