Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 07:11 PM2021-05-19T19:11:10+5:302021-05-19T19:15:50+5:30

Tauktae Cyclone in Sindhudurg: मुख्यमंत्री उद्ध ठाकरे हे शुक्रवारी २१ मेला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी-माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे.

Tauktae Cyclone: Politics in Sindhudurg will be stirred, CM Uddhav Thackeray and former CM Devendra Fadanvis will come to the district on the same day | Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार 

Tauktae Cyclone: सिंधुदुर्गातील राजकारण ढवळून निघणार, आजी-माजी मुख्यमंत्री एकाच दिवशी जिल्ह्यात येणार 

Next

- अनंत जाधव 
सावंतवाडी - तौक्ते वादळानंतर कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आजी माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शुक्रवारी २१ मे ला जिल्ह्यात दाखल होत आहेत. तर त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही येत असल्याने आजी माजी मुख्यमंत्र्यामुळे तौक्ते चक्रीवादळानंतर राजकारण ही ढवळून निघणार आहे. (Politics in Sindhudurg will be stirred, CM Uddhav Thackeray and former CM Devendra Fadanvis will come to the district on the same day)

तौक्ते चक्रीवादळ रविवारी सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर येउन धडकले आणि किनारपट्टी भागातच नव्हे तर आजू बाजूच्या तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. हे नुुकसान साधरणत: पन्नास कोटींचे असून, तौक्ते वादळाने किनारपट्टी भागातील छोटे छोटे हॉटेल तसेच लहान होडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाने अनेकांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. विद्युत विभागाचे ही मोठे नुकसान झाले असून,अनेक गावात गेले चार दिवस विद्युत पुरवठा सुरळित झाला नाही.

विद्युत विभागाने तर राज्यातील वेगवेगळ्या भागातून विद्युत कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठवले असून,हे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले असून,विद्युत विभागाचेच साधरणता १५ कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या वादळातील सगळ्यात मोठे वादळ असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी असे वादळ कधीही आले नव्हते. तौक्ते हे वादळांने रविवार हा दिवस भयानक असाच होता वादळामुळे पुढच्या क्षणी काय होणार हे कोणाला सांगता येत नव्हते. सर्वत्र अंधार पडला होता.अशात अनेकांनी जीव मुठीत घेउन रात्र काढली.

मात्र आता वादळानंतर नुकसान ग्रस्तांच्या दुुखा:वर फुकर घालण्यासाठी अनेक नेत्याची रिघ कोकणात लागणार आहे. महत्वाचे म्हणजे आजी माजी मुख्यमंत्री शुक्रवारीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असल्याने अनेकांचे लक्ष या  दौऱ्याकडे लागून राहिले असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.यात जी पडझड झाली आहे त्यात मिळणारी नुकसान भरपाई ही पूर्वीच्या निकषाप्रमाणे आहे. हे निकष केंद्र सरकारने ठरवून दिले आहेत. मात्र या निकषात आता बदल होणे गरजेचे असून, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २० घरे अशी आहेत कि ती पूर्ण पणे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात सत्ता आहे. या सत्तेमुळे केंद्राकडून जर नुकसान ग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी पथक आल्यास आणखीही मदत मिळू शकते. त्यामुळे या आजी माजी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

 

Web Title: Tauktae Cyclone: Politics in Sindhudurg will be stirred, CM Uddhav Thackeray and former CM Devendra Fadanvis will come to the district on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.