उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:27 PM2020-11-13T13:27:21+5:302020-11-13T13:28:34+5:30

rajanteli, sindhududrgnews उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.

The task of putting the Umaid Abhiyan in the throats of private people | उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम:  राजन तेली

Next
ठळक मुद्देउमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे कामसरकारकडून जनतेची थट्टा  :  राजन तेली

कणकवली : उमेद अभियान खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. सिंधुदुर्गनगरी येथे ५ हजार महिलांच्या मोर्चासमोर पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. ठाकरे सरकार नेमके कोणासाठी काम करीत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. याउलट विविध माध्यमातून जनतेची थट्टाच चालविली आहे, अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केली.

कणकवली येथील भाजपाच्या कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, भाजपाला बिहार निवडणुकीत खूप चांगले यश प्राप्त झाले आहे. बूथ अध्यक्ष यांना याचे श्रेय जाते. महाराष्ट्र सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या मंडळाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काम केले जात होते. सरकारने मत्स्य पॅकेज जाहीर केले. पण त्या पॅकेजमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. मच्छिमार बांधवांचे संपूर्ण कुटूंब काम करीत असते. मात्र, पॅकेजमधून मदत मिळण्यासाठी जाचक अटी सरकारने घातल्या आहेत. त्या पूर्ण करता येणे शक्य नाही.

पालकमंत्री, खासदार व शिवसेनेचे आमदार एकमेकांचे कौतुक करीत असतात. मात्र, जनतेच्या समस्या सुटत नाहीत. वाळू लिलाव झालेले नसताना कोल्हापूर व गोवा येथे जिल्ह्यातून शेकडो ट्रक जात आहेत. या चोरट्या वाळूच्या मागे कोण आहे? अधिकाऱ्यांशी हितसबंध कोणाचे आहेत ? गोवा येथून दारू जिल्ह्यात येतेच कशी ? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर अवैध धंद्यांविरोधात दिवाळीनंतर भाजपा सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारेल, असा इशाराही राजन तेली यांनी यावेळी दिला.

सिंधुदुर्गातील सर्वच निवडणुका जिंकणार

जिल्हा बँक व ७१ ग्रामपंचायती, ५० टक्के विकास संस्था, दोन नगरपंचायती यांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार आहे. उर्वरित पक्ष एकत्र आले तरी भाजपावर व खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास असल्याचे राजन तेली यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The task of putting the Umaid Abhiyan in the throats of private people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.