शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मिठमुंबरी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम मंजूर

By admin | Updated: September 13, 2014 23:25 IST

राज्यस्तरीय योजनेंतर्गत समाविष्ट

पुरळ : मिठमुंबरी बागवाडी येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे उर्वरित काम चालू आर्थिक वर्षामध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत कामांमध्ये समाविष्ट केले असून या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निधी उपलब्ध होताच काम करण्यात येईल, असे उत्तर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कपात सूचनेला दिले आहे.सन २०१४-१५च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात बंदर विभागाच्या चर्चेवेळी मनसे आमदार बाळा नांदगावकर, मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर यांनी मिठमुंबरी बागवाडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याबाबत कपात सूचना मांडली होती. मिठमुंबरी बागवाडी गावाची समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे होणारी धूप त्वरित थांबविण्यात यावी याकरिता गावातील ग्रामस्थांनी १९८७ पासून आतापर्यंत सातत्याने बागवाडी तरीच्या जेटीपासून समुद्राच्या काठाने बोंडगीनपर्यंत धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली होती. सद्यस्थितीत मिठमुंबरी बागवाडी येथे १०७० मीटर लांबीचे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरित २८० मीटर लांबीमध्येदेखील आवश्यकतेनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे, अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत उर्वरित २८० मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. मागणी केल्याप्रमाणे पुढील कामाच्या टप्प्याबाबतही शासनाकडून विचार झालेला नाही. यामुळे मिठमुंबरी बागवाडी या गावाची समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात धूप होत आहे.शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च करून दोन टप्प्यांमध्ये सात वर्षापूर्वी व त्यानंतर पुन्हा पाच वर्षापूर्वी अशी एकूण २१ हजार सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे काही वर्षांपूर्वी लागवड केलेल्या व वाढलेल्या झाडांची पडझड होऊ नये यासाठीही उर्वरित २८० मीटर व त्यापुढील बोंडगीनपर्यंतचे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी केली होती.या कपात सूचनेला उत्तर देताना राणे यांनी उर्वरित १२०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे काम चालू आर्थिक वर्षात समाविष्ट करण्यात आले असून निधी उपलब्ध होताच हाती घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मिठमुंबरी बागवाडी हा धूपप्रतिबंधक बंधारा श्रीवर्धनच्या धर्तीवर बांधण्यात यावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे. (वार्ताहर)