शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: January 29, 2015 23:37 IST

केसरकर यांची मध्यस्थी : ग्रामपंचायत कामकाजाचा प्रश्न सुटला

ओरोस : वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी झालेली सकारात्मक चर्चा व त्यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी १२ नोव्हेंबर २०१४ पासून सुरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. संगणक परिचालकांचा वेतनवाढीचा प्रश्न सुटला नसला तरी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा गेले अडीच महिने रखडलेला प्रश्न सुटला आहे.महाआॅनलाईन कंपनीतर्फे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १२ नोव्हेंबर २०१४ पासून कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. गेले अडीच महिने हे कामबंद आंदोलन सुरू होते. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील संगणक कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. संगणक परिचालकांना मिळणारे ४१०० रुपये वेतन तुटपुंजे असल्याकारणाने त्यांनी गेले अडीच महिने विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले होते.त्यावेळी जादा कामाचा मोबदला तसेच ३८०० रुपये मानधन देऊन काम करून घेतले जात होते. याबाबत अनेकवेळा बैठका, चर्चा झाली तरी यावर कोणताही ठोस निर्णय व तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे गेले अडीच महिने ग्रामपंचायतीमधील विविध दाखल्यांसह संपूर्ण संगणकीय कामकाज ठप्प झाले होते.दरम्यान, वित्त व ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांच्याशी झालेली सकारात्मक चर्चा आणि त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर संगणक परिचालकांनी अडीच महिने सुरू असलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाने संगणक परिचालकांच्या मानधनवाढीचा प्रश्न सुटला नसला तरी ग्रामपंचायतीचा गेले अडीच महिने ठप्प झालेल्या कामकाजाचा प्रश्न तूर्त सुटलेला आहे.वित्त व ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या लेखी पत्रात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी ९ जानेवारीला पाठविलेल्या पत्राप्रमाणे महाआॅनलाईनबरोबर पाठपुरावा करण्यात येईल.महाआॅनलाईनकडून संग्राम प्रकल्पांतर्गत स्टेशनरी खर्चात बचत झाल्यास त्या अनुषंगाने मानधन वाढविता येईल का? याबाबत महाआॅनलाईनसोबत चर्चा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. (वार्ताहर)ठोस आश्वासनांचे काही नियोजन नाहीपालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या लेखी पत्रात कोणत्याही मागण्यांबाबत ठोस निर्णय मिळालेला नाही. मानधनवाढ, नोकरीबाबत हमी, स्टेशनरी पुरवठा, आदींसह कोणत्याही मागणीवर ठोस निर्णय घेतला गेला नसून, संगणक परिचालकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.