शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोरद नदीतील दूषित पाण्याचा गावांना पुरवठा ?

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे

श्रीकांत चाळके -खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना करण्यात येत असलेला पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे. गेले काही वर्षे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत आहे. ज्या चोरद नदीतून पाणीपुवठा केला जातो, त्याच नदीतील पाणी दूषित झाल्याने संबंध टंचाईग्रस्त गावांमध्ये खळबळ उडाली आहे. हेच दूषित पाणी सध्या टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना पुरवण्यात येणार असल्याने यानिमित्ताने आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.़ तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी याबाबत योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़खेड तालुक्यातील नातूवाडी येथील धरणातून पाणी सोडले जात आहे़ हे पाणी सुकिवलीमार्गे खेड शहराला पुरविले जात आहे.़ धरणातील या पाण्यामुळे सुकिवली येथील चोरद नदीला वर्षभर पाणी असते़ याच पाण्यामुळे खेड शहरातील नागरिकांची पाण्याची सोय होत आहे. तालुक्यातील याच नदीतील पाण्यामुळे टंचाईग्रस्तांचीदेखील तहान भागविली जात आहे़ वर्षानुवर्षे हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, गेले काही वर्षे जानेवारी ते जून महिन्यादरम्यान विविध कारणांनी या नदीतील पाणी दूषित आहे़ तात्पुरता उपाय शोधण्याखेरीज प्रशासनाने आणि संबंधित ग्रामपंचायतीने आजपर्यंत काहीही केलेले नाही़ या नदीत कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरे धुणे आदी प्रकार नित्याचेच होत आहेत़ आजही असे प्रकार सुरू आहेत़ विविध प्रकारची वाहने धुतली जात असल्याने या नदीतील पाणी दूषित झाले आहे़ वाहने धुतल्याने वाहनातील आॅईल पाण्यावर तरंगत असते़ याच नदीकिनारी परप्रांतीय कामगारांची वस्ती आहे. हे सर्व कामगार याच पाण्यात आंघोळ करीत आहेत़ यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच दूषित पाणी खेड शहराला प्यावे लागत आहे़ यावर्षीही तालुक्यातील खवटी, तुळशी आणि दिवाणखवटी या ३ गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे़ खासगी टँकरद्वारे पैसे घेऊन पाणी पुरवले जात असल्याचे समोर आले आहे़काही लीटर पाण्याचा उपसा करण्याचा परवाना असूनही परवान्याच्या शंभर पट दूषित पाणी खासगी टँकरद्वारे उपसले जात आहे.़ सुकिवली आणि भरणे ग्रामपंचायतींनी याबाबत प्रतिवर्षी उपाययोजना करूनही हे पाणी दूषित करण्यात येत आहे. तहसीलदारांकडून कारवाईचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकांवरील आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत़ आता तहसीलदारांनी देखील याबाबत सत्वर पावले उचलणे आवश्यक झाले आहे़ तालुक्यात पाण्याचे ४६ नमुने दूषित असल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर देखील या पाण्याच्या शुध्दिकरणाकडे डोळेझाक का केली जात आहे़ तहसीलदार किंवा संबंधित ग्रामपंचायतीने या नदीकिनारी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नातूनगर येथील धरणातून होणारा हा पाणीपुरवठा एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने पुढे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.