सुनेचा खून : सासू-सासऱ्याना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:51 PM2019-09-23T16:51:03+5:302019-09-23T16:51:58+5:30

सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुणकवळे येथील सासू, सासरे, चुलत सासरे या तिघांना येथील पोलिसांनी अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

Sun murder: mother-in-law arrested | सुनेचा खून : सासू-सासऱ्याना अटक

सुनेचा खून : सासू-सासऱ्याना अटक

Next
ठळक मुद्देसुनेचा खून : सासू-सासऱ्याना अटक सावंतवाडी कारागृहात रवानगी

मालवण : सुनेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुणकवळे येथील सासू, सासरे, चुलत सासरे या तिघांना येथील पोलिसांनी अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.

कुणकवळे येथील काव्या गोपाळ देसाई या विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती गोपाळ सुरेश देसाई, सासरा सुरेश गोपाळ देसाई, सासू सुचिता सुरेश देसाई, चुलत सासरा अनिल गोपाळ देसाई या चौघाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यात पती गोपाळ देसाई याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. सासू, सासरे, चुलत सासरे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

या तिघांचाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे शनिवारी तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.

Web Title: Sun murder: mother-in-law arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.