शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट पाईपलाईनचे काम बंद पाडले

By admin | Updated: January 6, 2015 01:19 IST

भाजपा कार्यकर्ते आक्रमक : ठेकेदाराचे नियमाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन

दोडामार्ग : मणेरी नदीचे पाणी वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी घालण्यात येत असलेल्या पाईपलाईनचे काम योग्य पध्दतीने निमयाप्रमाणे होत नसल्याने सासोली येथे जात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांच्या नेतृत्वाखाली हे काम बंद पाडले. यावेळी पोटठेकेदार म्हणून काम करणारे शिवसेनेचे विभागप्रमुख सज्जन धाऊसकर व राजेंद्र म्हापसेकर यांच्यात काम बंद पाडल्याच्या कारणास्तव शाब्दिक चकमक उडाली. अखेर पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्या शिष्टाईनंतर ठेकेदार देशपांडे याने नियमाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तोपर्यंत काम बंद ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिला. तिलारी नदीचे पाणी मणेरी येथे अडवून ते वेंगुर्लेपर्यंत नेण्यासाठी पाईप लाईनचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. सासोली ते आडाळी दरम्यान ११ फूट खोल चर खोदून पाईप लाईन टाकली जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला चार खोदण्यात आला आहे. पाईप टाकल्यानंतर त्यावर माती ओढताना पाणी मारून मातीचे तीन थर लावून रोलरने पिचींग केल्यानंतरच पाईप लाईन बुजविणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने पावसाळ्यात ही माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या पाईप लाईनचे काम नियमाप्रमाणे करण्यात यावे, अशी सूचना चार दिवसांपूर्वी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी केली होती. परंतु तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत पाईप लाईनचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. त्याची माहिती म्हापसेकर यांना समजताच त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धडक दिली व जोपर्यंत नियमाप्रमाणे काम होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याची सूचना केली. यावेळी सेनेचे विभागप्रमुख सज्जन धाऊसकर त्याठिकाणी आले. या कामाचा पोटठेका माझ्याकडे आहे. तुम्हाला आम्ही काम अडवू देणार नाही. तुम्ही संबंधित यंत्रणेशी भांडा, असे सांगितले. यावेळी म्हापसेकर यांनी, तुम्ही जर पोटठेकेदार आहात, तर तुम्हीच तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करता येणार नाही. जर एखादा अपघात झाला असता, तर त्याला जबाबदार कोण? असे सांगितले. त्यामुळे म्हापसेकर व धाऊसकर यांच्या काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी म्हापसेकर यांनी, आमचा स्थानिकांना विरोध नाही. पण काम नियमाप्रमाणे झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली. दरम्यान, पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सूर्यवंशी यांनी ठेकेदार देशपांडे यांना काम नियमाप्रमाणे करण्याची सूचना केली. देशपांडे यांनीही नियमाप्रमाणे काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत काम बंदच ठेवण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. यावेळी सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, चेतन चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)