शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिव छत्रपतींचा पुतळा आता राजकोटला; सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नौदल तयार, जमीन मालकाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:05 IST

जमिनीचा ताबा मिळत नसल्याने नौसेनेने या जागेचा हट्ट सोडला

मालवण: किल्ले सिंधुदुर्ग येथे जागा उपलब्ध न झाल्याने आता राजकोट किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी जमिनीची मोजणी करून जागाही निश्चित करण्यात आली आहे. नौसेनेच्या अधिकाऱ्यांनीही या जागेची पाहणी केलेली असून किल्ले सिंधुदुर्गसमोरच हा पुतळा बसविण्यात येणार असल्याचे समजते. महसूल विभागाकडूनही या जागेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रेही नौसेनेकडे सादर केल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. किल्याच्या मध्यभागी एक जागा नौसेनेकडून निश्चित करण्यात आली होती. ही जागा कोणाची आहे? याचा शोध घेण्यासाठी तीन ते चारवेळा भूमी अभिलेख विभागाकडून सर्व्हे करण्यात आला होता. नौसेनेकडून जी जागा निश्चित करण्यात आली होती. ती जागा नेमकी शासकीय जमिनीत दिसून आली नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांकडून संबंधित जमीन मालकांशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, संबंधित जमीन मालकांनी शासनाला जमीन देण्यास विरोध दर्शविला. किल्ल्याच्या मध्य भागी असलेली ही जागाच नौसेनेला हवी होती. त्यामुळे जमिनीचा ताबा मिळत नसल्याने नौसेनेने या जागेचा हट्ट सोडला असल्याची माहिती पुढे आली आहे.जमीन मालकाने शासनाला जमीन देण्यास विरोध दर्शविल्यामुळे गेले दोन महिने प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या जमीन शोध मोहिमेच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथे नौसेना दिन साजरा होत असताना किल्ले सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी शासनाकडून जमिनीचा शोध घेण्यात येत होता. नौसेना विभागाकडून पसंत करण्यात आलेली जमीन ही खासगी मालकीची असल्याने जमीन मालकांनी शासनाला जमीन देण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता छत्रपतींचा पुतळा मालवण शहरात बसविण्यासाठी किनारपट्टीवरील जागेचा शोध घेतला जात होता. ३५ फूट उंची पुतळायंदाचा भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार आहे. कार्यक्रमापूर्वी किल्ल्यात सुमारे ३५ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प नौसेनेने केला होता. मात्र आता तो राजकोटला उभारला जाईल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज