शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:26 IST

Maharashtra's Siindhudurg Election 2019 : राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे.

कणकवली :-  राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे युतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली आणि त्यात बोलावणं आलं तर तेथे जाऊन शिवसेना उमेदवाराचा प्रचार करायलाही आम्ही तयार आहोत. त्याच धर्तीवर शिवसेनेने देखील युतीचा धर्म पाळावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी येथे केले. कणकवलीमतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना आपला उमेदवार उभा करणार नाही. तसे केल्यास राज्यातील युती भंग होऊ शकते, असेही ते म्हणाले. येथील भाजप कार्यालयात नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार नितेश राणे हे आता भाजपचे तथा युतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गसह राज्यात इतर ठिकाणी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी तुम्ही जाणार का ? असा प्रश्न श्री राणे यांना विचारला असता, युतीचा धर्म पाळावा लागेल. जर शिवसेनेकडून बोलावणे आले तर उद्धव ठाकरे यांच्या सभेत जाऊनही आम्ही प्रचार करायला तयार आहोत. मात्र बोलावणं यायला हवं. तसंच कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारातही शिवसेनेने सहभागी व्हायला हवे.युतीचा धर्म त्यांनी पाळायला हवा, असे राणे म्हणाले. स्वाभिमान पक्षाचे भाजपात विलीनीकरण केव्हा होईल या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण टप्याटप्याने होणार आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल त्यावेळी मोठ्या दिमाखात हा विलीनीकरण सोहळा होईल. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आपण नंतर बोलू, असेही राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपाkankavli-acकणकवलीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019sindhudurgसिंधुदुर्ग