शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहा कासार, निकिता सुतार प्रथम

By admin | Updated: January 1, 2015 00:16 IST

स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धा : राज्यस्तरीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व

सिंधुदुर्गनगरी : जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ गटात सावंतवाडीच्या स्नेहा सुरेश कासार हिने, तर कनिष्ठ गटात कणकवलीच्या निकिता प्रदीप सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे दोघेही राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रत्येकाने नियोजन करून चालत रहावे, राजमार्ग आपोआप मिळत जातो. हा देश युवकांच्या हातात आहे. जर युवक स्वच्छतेबाबत जागरूक झाले तर स्वच्छ भारताचे स्वप्न दूर नाही, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले. ते जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, सावंत, कसालकर, मंगेश मराठे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक नीलेश मठकर, संतोष कटबू, इंदिरा परब, संदीप पवार, आदी उपस्थित होते. पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत दरवर्षी देशात लोकचळवळ निर्माण व्हावी, लोकसहभागातून निर्णय प्रक्रिया उभी राहावी या हेतूने २ आॅक्टोबर ते १२ जानेवारी या कालावधीत स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ गटांत घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत वरिष्ठ गटात स्नेहा कासार यांनी प्रथम, वेंगुर्ला येथील समृद्धी पेडणेकर द्वितीय, तर कुडाळ येथील कल्पना ठुबरे व सावंतवाडी येथील गीतांजली पेडणेकर यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला आहे, तर कनिष्ठ गटात कणकवलीच्या निकिता सुतार हिने प्रथम, कुडाळच्या जागृती राणे हिने द्वितीय, तर सावंतवाडीच्या नेहा प्रभू यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. (प्रतिनिधी) विजेत्यांचा गौरव होणारस्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेतील विजेत्या दोन्ही गटांतील स्पर्धकांना प्रथम क्रमांकास रुपये ११ हजार, द्वितीय क्रमांकास रुपये ७ हजार, तर तृतीय क्रमांकास रुपये पाच हजारांचे रोख पारितोषिक नजीकच्या होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांनी दिली.