शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

सिंधुदुर्ग : बायोगॅस सयंत्रामुळे गाव धुरमुक्त होईल : जयप्रकाश परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:15 PM

बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले.

ठळक मुद्देबायोगॅस सयंत्रामुळे गाव धुरमुक्त होईल : जयप्रकाश परबबापर्डे येथे बायोगॅस सयंत्र बांधकामाचा प्रारंभ

सिंधुदुर्ग : बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले.राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायत बापर्डे येथे बायोगॅस सयंत्र बांधकामाचा शुभारंभ पंचायत समिती गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या अनघा राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी सरपंच संजय लाड, विस्तार अधिकारी सुनील पांगम, ग्रामसेवक शिवराज राठोड, ग्रामपंचायत सदस्य विश्राम नाईकधुरे, गुणवंत राणे, सीमा नाईकधुरे, प्रियांका राणे, रेवती मोंडकर, बापर्डे सोसायटी चेअरमन अजित राणे, संदीप नाईकधुरे, संतोष नाईकधुरे, जिल्हा बँक बापर्डेचे व्यवस्थापक संतोष नारकर, बापर्डेचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष धुरे, बाळकृष्ण नाईकधुरे, लाभार्थी संतोष नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.पंचायत समितीकडून मिळणार १५, ६00 चे अनुदानयावेळी बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी जयप्रकाश परब यांनी शासनाकडून १२००० तसेच पंचायत समिती सेसकडून प्रति सयंत्र २००० व बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यास १६०० रुपये असे एकूण १५६०० रुपये अनुदान मिळणार असल्याचे सांगितले.

तसेच ग्रामपंचायत बापर्डेची कुटुंब संख्या ४७१ असुन सुमारे ४० टक्के कुटुंबांकडे गॅस सिलिंडर आहे. महागाईच्या दृष्टीने विचार केल्यास सिलेंडरची खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंबाला दरवर्षी १२००० प्रमाणे २२,५६,००० एवढी रक्कम बापर्डे गावामधून गॅस सिलिंडरवर खर्च केली जाते.जास्तीत जास्त ग्रामस्थंना बायोगॅस सयंत्राचा लाभबायोगॅस सयंत्राचा वापर केल्यास बापर्डे गावातील ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल व नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करून आपला गाव धुरमुक्त करण्यात मदत होईल, असे जयप्रकाश परब यांनी सांगितले.

यावेळी बापर्डे गावचे सरपंच संजय लाड म्हणाले, माझे बापर्डे गाव आपल्या जिल्ह्यात एक आदर्श गाव होण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत असून या गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांना बायोगॅस सयंत्राच्या माध्यमातून लाभ देण्याचा निर्धार आपण केला आहे. 

टॅग्स :block development officerगटविकास अधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग