शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

सिंधुदुर्ग  : मंत्रिपदाची उतराई विकासातून : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 4:02 PM

भविष्यात जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघ सक्षम करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देमंत्रिपदाची उतराई विकासातून : दीपक केसरकर खरेदी-विक्री संघाच्या सभागृहाचे उद्घाटन

सावंतवाडी : मी विकासात कोठेही राजकारण करत नाही. मात्र मला मिळालेल्या मंत्रिपदाची उतराई विकासातून करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचा जास्तीत जास्त विकास करणे हेच माझे ध्येय आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघ सक्षम करणार असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.तालुका खरेदी-विक्री संघाच्या सावंतवाडीतील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, सहनिबंधक दीपक खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सखाराम ठाकूर, उपाध्यक्ष अरूण गावडे, नगसेवक बाबू कुडतरकर, ज्येष्ठ नेते वसंत केसरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गजानन गावडे, अशोक दळवी, दिलीप सोनुर्लेकर, सुनील देसाई, माजी संचालक अभिमन्यू लोढे, संदीप केसरकर आदी उपस्थित होते.सावंतवाडीतील खरेदी-विक्री संघ हा जुना आहे. या खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. या खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून रोजगार यावा अशी भूमिका संघाची आहे. त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतून काय नवीन करता येते का हे मी मंत्री म्हणून बघेनच.

सध्या रेशनिंगवर रॉकेल मिळत नाही. त्यामुळे खुल्या बाजारात रॉकेल मिळावे यासाठी जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघांनी पुढे यावे. मी त्यांना मदत करेन, असे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.

मी विकासात कोणतेही राजकारण करणार नाही आणि टिकेला उत्तरही देणार नाही. मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण मला मंत्रिपदाची विकासातून उतराई करण्याची संधी आली आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त निधी सिंधुदुर्गमध्ये आणला आहे, असेही ते म्हणाले.यावेळी अध्यक्ष सखाराम ठाकूर यांनी संघाला एखादी गॅस एजन्सी मिळावी, अशी मागणी मंत्री केसरकर यांच्याकडे केली. या उद्घाटन समारंभानिमित्त गुणवंतांचा तसेच वयोवृद्धांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग