सिंधुदुर्ग : ऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणी, सिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:02 PM2018-04-02T15:02:03+5:302018-04-02T15:02:03+5:30

ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील मसुरे आणि वेरळ गावात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. यंत्राद्वारे होत असलेल्या ऊस तोडणीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शनिवारी पाहणी केली.

Sindhudurg: Successful trial of the sugarcane trough of sugarcane machine, Sindhudurg back, D. Y Attempts of Patil factory | सिंधुदुर्ग : ऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणी, सिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

सिंधुदुर्ग : ऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणी, सिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

Next
ठळक मुद्देऊस तोडणी यंत्राची मसुरेत यशस्वी चाचणीसिंधुदुर्ग बॅक, डी. वाय. पाटील कारखान्याचे प्रयत्न

सिंधुदुर्ग : ऊस उत्पादकांसाठी वरदान असलेले ऊस तोडणी यंत्र सिंधुदुर्गात दाखल झाले आहे. सिंधुदुर्ग बँक व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून दाखल झालेल्या या यंत्राच्या सहाय्याने मालवण तालुक्यातील मसुरे आणि वेरळ गावात ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. यंत्राद्वारे होत असलेल्या ऊस तोडणीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पाहणी केली.

तोडणीसाठी कामगार मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मालवण मसुरे-वेरळ भागातील ऊस कामगार नसल्याने तोडायचा राहिला होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून तसेच सिंधुदुर्ग बँक व डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या प्रयत्नातून निपाणी येथून ऊस तोडणी यंत्र मागविण्यात आले.

मसुरे-मार्गाचीतड येथे आलेल्या यंत्राद्वारे दिलीप बागवे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू करण्यात आली. दिवशी १२० टन ऊस तोडणीची क्षमता या यंत्रात आहे. मसुरे परिसरात शिल्लक असलेला ऊस या यंत्राच्या सहाय्याने तोडून कारखान्याकडे पाठविला जाणार आहे.

सिंधुदुर्गात सर्वप्रथम शनिवारी वेरळ गावात यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणीला सुरुवात झाली. त्याची पाहणी करण्यासाठी संग्राम प्रभुगावकर छोटू ठाकूर, मसुरे सरपंच लक्ष्मी पेडणेकर, पुरुषोत्तम शिंदे, जग्गू टेलर, शेतकरी दिलीप सावंत, बाळकृष्ण बागवे, संजय परब, गोविंद मसुरकर, पांडुरंग सावंत तसेच साखर कारखान्याचे एस. एस. पवार, भागोजी शेळके, प्रवीण रासम आदी उपस्थित होते.

यंत्राव्दारे ऊस तोडणी सुरू : सतीश सावंत

सतीश सावंत म्हणाले, ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांची टंचाई असल्याने उत्पादक शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता सिंधुदुर्गातही यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू झाली आहे.
पुढील हंगामात कणकवली, वैभववाडी परिसरात दोन ते तीन यंत्रे ऊस तोडणीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी चार मीटर सरीने ऊस लागवड व ऊसातील तणाची साफसफाई यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

ऊसशेतीचे क्षेत्र विस्तारण्यास तोडणी यंत्राची मदत होणार असून शेतकऱ्यांकडे आर्थिक समृध्दी येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी नदीतील गाळामुळे पुराचे पाणी शेतामध्ये घुसून नुकसान होते आदी समस्या सावंत यांच्याकडे मांडल्या.

सिंधुदुर्गात दाखल झालेल्या ऊस तोडणी यंत्रामार्फत मसुरे मार्गाचीतड, वेरळ भागातील ऊस तोडणी शनिवारी करण्यात आली. त्याची पाहणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संग्राम प्रभुगावकर, छोटू ठाकूर आदींनी केली.

Web Title: Sindhudurg: Successful trial of the sugarcane trough of sugarcane machine, Sindhudurg back, D. Y Attempts of Patil factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.