सुपीकता वाढीसाठी आता तंत्रज्ञानाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:36 PM2018-03-15T23:36:17+5:302018-03-15T23:36:17+5:30

रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे.

Now the basis of technology for fertility growth | सुपीकता वाढीसाठी आता तंत्रज्ञानाचा आधार

सुपीकता वाढीसाठी आता तंत्रज्ञानाचा आधार

Next
ठळक मुद्देश्रेडर यंत्र ठरणार उपयोगी : बोंडअळीचे कोष नष्ट करण्याचा मार्ग

प्रशांत हेलोंडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : रासायनिक खते, फवारण्यांच्या भडीमारामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. परिणामी, शेतमालाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत असून पिकांवरील रोगांची संख्या वाढीस लागली आहे. या सर्वांवर सेंद्रिय शेती, हाच एक पर्याय असल्याचे सर्वमान्य असले तरी प्रत्यक्ष कुणी धाडस करताना दिसत नाही; पण आता बोंडअळीच्या निमित्ताने का होईना शेतकरी ‘श्रेडर’ या यंत्राच्या साह्याने शेतातील कपाशी काढत आहे. जमिनीचाब कस वाढविण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे.
कपाशीवर गुलाबी व बोंडअळीने हल्ला केला. परिणामी, एक-दोन वेच्यातच शेतातील कापूस संपला. काहींनी धाडस तथा खर्च करून उर्वरित कापूस वेचला; पण तो विविध आजारांना जन्म देणारा ठरत आहे. शिवाय व्यापारी तो खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. बोंडअळीने हल्ला केलेली कपाशीची शेती सध्या शेतकºयांना डोकेदुखीच ठरत आहे. कपाशी उपटण्याकरिता मजूर सापडत नाही. शिवाय ती मुळासकट शेतातून बाहेर करायची असल्याने अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कपाशीची शेती जैसे थे ठेवल्याचे दिसते. असे असले तरी पूढील खरीप हंगामासाठी जमीन मोकळी करावी लागणार आहे. यामुळे शेतकरी मिळेल त्या मार्गाने कपाशीची शेती रिकामी करीत आहे.
कपाशीची शेतजमीन रिकामी करण्यासाठी शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत नवीन पर्याय उपलब्ध आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने चालविता येणाऱ्या ‘श्रेडर’ यंत्राद्वारे शेतातील कपाशीची झाडे उपटून टाकता येतात. हे यंत्र केवळ पऱ्हाटी उपटतच नाही तर त्याचे बारिक कुटारामध्ये रूपांतर करते. यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे श्रम वाचतात. शिवाय कपाशीच्या झाडांची बारिक भुकटी शेतातच पडून राहिल्याने बायोमास जमिनीत जाऊन सुपिकता वाढते. यामुळे श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे नेणारा दुवा ठरणार असल्याचेच दिसते.
१२०० ते १५०० रुपये एकरप्रमाणे खर्च
सध्या काहीच गावांमध्ये श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. या यंत्राद्वारे शेतकरी शेतातील कपाशी काढून घेत आहेत. हे यंत्र कमी असल्याने कपाशी काढण्याकरिता अधिक आकारणी केली जात असल्याचे दिसत आहे. सध्या १२०० ते १५०० रुपये प्रती एकरप्रमाणे कपाशीची काढणी केली जात आहे. ही रक्कम अधिक वाटत असली तरी शेतकऱ्यांना मजुरांकडून कपाशी काढण्याकरिताही सुमारे ८०० ते १००० रुपये प्रती एकर खर्च लागत आहे. या यंत्राचा फायदा अधिक असल्याने शेतकऱ्यांनी त्याद्वारे कपाशीची उलंगवाढी करणे उपयुक्त ठरणार आहे.
शासनाकडून सबसिडी
शेतकºयांना श्रेडर खरेदी करण्यासाठी यांत्रिकीकरण योजनेतून शासनाकडून ६३ हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. सदर यंत्राची बाजारात किंमत १ लाख ७५ हजार रुपये असून शेतकºयांना केवळ १ लाख १२ हजार रुपये खर्च करायचे आहे. यातून ट्रॅक्टरधारक शेतकºयांना व्यवसायही उपलब्ध होऊ शकतो. या यंत्राद्वारे कपाशीची काढणी करण्यासाठी यंत्रधारकास डिझेल, चालक असा ६०० रुपये प्रतीएकर खर्च येतो. यामुळे यातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

प्रत्येक गावातील किमान एका ट्रॅक्टरधारक शेतकऱ्याने श्रेडर मशीन खरेदी करावी. या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय गावातच यंत्र राहिल्यास शेतकऱ्यांनाही कमी खर्चामध्ये शेतजमिनी रिकाम्या करता येतील.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

Web Title: Now the basis of technology for fertility growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.